रत्नागिरी, (आरकेजी) : मुसळधार पावसामुळे खेड शहराजवळून वाहणाऱ्या जगबुडी नदीला पूर आला आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खेड मच्छिमार्केट परिसरात जगबुडीचे पाणी आले आहे. उपाय योजना म्हणून व्यापाऱ्यांनी दुकानातील सामान दुसरीकडे नेण्यास सुरवात केली आहे.
खेड तालुक्यातून वाहणार्या जगबुडीला जेव्हा जेव्हा पूर येतो, तेव्हा शहरवासीयांची दाणादाण उडते. कालपासून पडत असलेल्या पावसामुळे सध्या जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नागरिकांना सतर्क करण्यासाठी खेड नगर परिषदेने मोबाईलवर एसएमएस देखील पाठविले आहेत. भोंगाही वाजवून जनतेला सतर्क केले आहे.