
मुंबई : पे नियरबाय या आघाडीच्या हायपरलोकल फिनटेक नेटवर्कला आयआरडीएने इन्शुरन्स ब्रोकिंग परवाना प्रदान केला आहे. नियरबाय इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रा. लि. निर्माण करून या कंपनीने सर्वसामान्य लोकांना जवळपासच्या दुकानात स्वस्तात विमा मिळावा यासाठी विमा क्षेत्रात पदार्पण केले आहे. लॉन्च धोरणाचा एक भाग म्हणून पेनियरबायने वी केअर इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेसचे संपादन केले आहे.
पे नियरबायचे सध्याचे सुमारे ६ लाख रिटेलर्सचे नेटवर्क एक नवीन सशक्त चॅनल तयार करण्यात मोठे काम करेल, हे असे चॅनल असेल ज्यामध्ये कधीच विमा न विकलेल्या लोकांना कधीही विमा न घेतलेल्या लोकांना तो विकण्यासाठी प्रशिक्षित केले जाईल. देशाला विमाकृत करणे आणि सर्वांसाठी आर्थिक सुरक्षा उपलब्ध करून देणे हा यामागील उद्देश आहे.
पे नियरबायचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद कुमार बजाज म्हणाले, “आयआरडीए परवाना ही केवळ परवानगी नाही तर आमच्या ६ लाख आणि वाढत्या डिजिटल प्रधान पार्टनर्सच्या माध्यमातून विमा ही एक सर्वव्यापी सेवा बनवण्यासाठी आमच्यावर टाकलेलीएक जबाबदारी आहे. देशात विम्याचे प्रमाण खूप कमी आहे याचा अर्थ अनेक भारतीय जीवनाच्या अनिश्चिततेसमोर लाचार आहेत. आमच्या नेटवर्कच्या माध्यमातून, सर्वांना सहजतेने उपलब्ध होईल अशा स्वरुपात विमा उपलब्ध करून देऊन या समस्येवर मात करता येईल, असे आम्हाला वाटते. वी केअर इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस या एका उत्कृष्ट आधुनिक ब्रोकिंग कंपनीचे संपादन केल्याने या क्षेत्रातील त्यांचे कौशल्य आणि आमची वितरण क्षमता यांच्या संयोगाने आम्ही सर्वांसाठी विमा प्राप्त करू शकू.”
















