रत्नागिरी: १२ व १३ मे रोजी होणाऱ्या ‘आयपीएल’च्या चार सामन्यांचा थरार छ. शिवाजी स्टेडियमवर अनुभवता येणार आहे. मोठ्या स्किनवर क्रिकेटचे हे सामने दाखविण्यात येणार असल्याचे रत्नागिरी जिल्हा किकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा आमदार उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. बीसीसीआयने विवो च्या सहकार्याने तयार केलेल्या आयपीएल फन पार्क योजनेत देशभरातील ३६ शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यात रत्नागिरीची पथमच निवड करण्यात आली आहे. आयपीएलमधील क्रिकेट संघांचे सामने त्या शहरांमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. या शहरांना वगळून देशातील निवडक ३६ शहरांची फन पार्कची निवड करण्यात आलेली आहे. त्यासाठी मोठ्या स्किनवर सामने दाखवितानाच तेथील स्टेडियमचा आभास निर्माण करण्यात येणार आहे. हजारों पेक्षकांना आपल्या कुटुंबासह हे सामने विनामूल्य पाहता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. रत्नागिरीत पहिल्यादा आयपीएलचे सामने ४० बाय ३५ फूट एलईडी पडद्यावर थेट प्रेक्षपण छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथे मोफत बीसीसीआय दाखवणार आहे. शनिवार दिनांक १२ मे व १३ मे रोजी हे आय पी एल चे सामने दाखवणार आहेत. आय पी एल फन पार्क असे या कार्येक्रमाचे नाव आहे. १२ मे रोजी सायंकाळी ४.०० वा. किंग इलेव्हन पंजाब विरुद्ध कोलकाता नाईट रायडर व रात्री ८.०० वा. दिल्ली डेलडेवीस विरुद्ध रॉयल चॅलेंज बंगेलरू , १३ मे रोजी सायंकाळी ४.०० वा. चेन्नई सुपर किंग विरुद्ध सन रायजर हैद्राबाद व रात्री ८.०० वा मुंबई इंडियन विरुद्ध राजस्थान रॉयल असे सामने रत्नागिरीकर यांना पाहायला मिळणार आहेत.किकेटची अनुभूती मिळण्यासाठी व खेळण्यासाठी खास गोलंदाजीची यंत्रणाही बसविली जाणार आहे. या पत्रकार परिषदेला असोसिएशनचे कार्याध्यक्ष बिपीन बंदरकर, सहसचिव निलेश भोसले, दिपक देसाई, सुरेश जैन, बलराम कोतवडेकर, किशोर भुते, श्रध्दानंद सावंत, अमित लांजेकर आदी मान्यवर उपस्थित होते.