मुंबई : कोरोनाचा प्रभाव वाढत असताना गेल्या आठवड्यात दोन्ही शेअर बाजारात फार्मा, एफएमसीजी आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांनी परिस्थिती तारली असे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी व्यक्त केले. निफ्टी फार्माने ४.७७% ची बढत घेतली तर लुपिन ही सर्वोत्कृष्ट परफॉर्मर ठरली. एनएसईमध्ये लुपिनने १४.३३%ची वृद्धी केली. यूएसएफडीएने औरंगाबाद सुविधेला मंजूरी दिल्यामुळे हा परिणाम पहायला मिळाला. तसेच सन फार्माने ९.४३% ची बढत घेतली तर टोरेंट फार्मानेदेखील ६.०२% वृद्धी दर्शवली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये दुहेरी अंकांची बढत घेणा-यांमध्ये लुपिनसह मोरपेन लॅब्स, मार्कसन्स फार्मा आणि पॅनाकिया बायोटेक यांचा समावेश आहे.
निफ्टी एफएमसीजीनेही उदासीनतेचा ट्रेंड झटकत १७८ अंकांची बढत घेतल्याचे अमर देव सिंह यांनी सांगितले. आयटीसी आणि इमामीला स्पष्ट बढत मिळत त्यात अनुक्रमे ६.९१ टक्के आणि ६.१२ टक्क्यांची वाढ झाली. एस अँड पी बीएसई एफएमसीजीने ०.८४ टक्क्यांची वाढ घेतली. त्यानंतर ओएनजीसीने एनएसईमध्ये ६.२४ ची वाढ दर्शवली. बीपीसीएल, अदानी ट्रान्समिशन, पावरग्रिड, आयओसी आणि एचपीसीएललाही आज फायदा झाला. मात्र टाटा पावरच्या शेअर्सचे ४.४४ टक्क्यांचे नुकसान झाले.