मुंबई, : भारत, दक्षिण आफ्रिका व यूएई येथील आघाडीच्या पाच पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचा सहयोग असलेल्या न्यूबर्ग डायग्नॉस्टिक्सने विस्तार करण्यासाठी भारत, मध्य पूर्व व आफ्रिका येथे 300 कोटी रुपयांची गुंतवणूक करायचे ठरवले असून त्यासाठी अंतर्गत पद्धतीने निधी उपलब्ध केला जाणार आहे,” असे न्यूबर्ग डायग्नॉस्टिक्सचे अध्यक्ष जीएसके वेलू यांनी सांगितले.डायग्नॉस्टिक क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर भर देणाऱ्या कंपनीने भारतातील व परदेशातील लॅबोरेटरीज ताब्यात घेण्यासाठी व त्या अपग्रेड करण्यासाठी अगोदरच 450 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.न्यूबर्गकडे दक्षिण व पश्चिम भारतात सध्या 50 लॅब आहेत व 500 केंद्रे आहेत आणि येत्या तीन वर्षांत त्यांची संख्या 150 लॅब व 1,000 केंद्रांपर्यंत वाढवण्याचे कंपनीचे नियोजन आहे.“बेंगळुरू, अहमदाबाद व डर्बन (दक्षिण आफ्रिका) येथे असलेल्या आमच्या तीन जागतिक दर्जाच्या रेफरन्स लॅबोरेटरीज आधुनिक इन व्हर्टो डायगनॉस्टिक्स टेक्निक वापरून प्रगत टप्प्यातील चाचणी करतात,” असे त्यांनी नमूद केले. अचूक निदान करणारे जेनॉमिक्स, मेटबलोमिक्स व प्रोटोमिक्स असे आधुनिक तंत्रज्ञान आणि जेथे रुग्णालये, फार्मा कंपन्या व पॅथॉलॉजिस्ट एकत्र काम करतात ते कॉम्बिनेशन डायग्नॉस्टिक्स हे डायग्नॉस्टिक्स उद्योगाचे भवितव्य असणार आहे.“भारत तंत्रज्ञानाच्या बाबतीत पिछाडीवर आहे आणि आम्हाला त्यावर अधिक लक्ष द्यायचे आहे,” असे ते म्हणाले.आनंद डायग्नॉस्टिक लॅबोरेटरी, सुप्राटेकमायक्रोपॅथ, एऱ्हिक लॅब, ग्लोबल लॅब व मिनेव्हरा लॅब या आघाडीच्या पाच लॅबोरेटरीचा सहयोग असलेल्या या कंपनीने आणखी तीन पायाभूत सुविधा मॉडेल संपादित करायचे ठरवले आहे नवे तंत्रज्ञान उपलब्ध होण्यासाठी व भारतात आणण्यासाठी कंपनीला अमेरिका व युरोपीय देशांतही संशोधन केंद्रे सुरू करायची आहेत.“या प्रदेशांतील काही विद्यापीठे व लहान लॅब यांच्याशी या संदर्भात बोलणी सुरू आहेत,” असे ते म्हणाले.वार्षिक 15 टक्के दराने प्रगती करत असलेल्या कंपनीचे एकत्रित उत्पन्न गेल्या वर्षी 400 कोटी रुपये होते व 2021-22 पर्यंत ते 1,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची अपेक्षा आहे. असेही ते म्हणाले.