मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दि. 21 जून रोजी नांदेडमध्ये राज्यस्तरीय कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बाबा रामदेव उपस्थित राहणार असल्याची माहिती शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.
आज मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघ येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी बाबा रामदेव उपस्थित होते.
ॲड. शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस घोषित केला असून जगभरातील देश हा दिवस उत्साहाने साजरा करीत आहेत. स्वस्थ महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित नांदेड येथील कार्यक्रमास पतंजली योगपीठाचे सहकार्य मिळणार असून दीड लाखापेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी योगासने करता येतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.
यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस राज्यातील ३६ जिल्हा मुख्यालय आणि ३२२ तालुका मुख्यालय अशा ३५८ ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. या योग दिनामध्ये प्रत्येक तालुक्यातील किमान 5 हजार विद्यार्थी (शाळा/महाविद्यालये/एनएसएस/एनसी
योगामुळे आयुष्य चांगले — बाबा रामदेव
नियमितपणे योग केल्याने आपला दिवसच नाही तर आयुष्य चांगले होईल. आजारापासून आपण दुर राहू असे बाबा रामदेव यांनी योग दिनाच्या पार्श्वभूमीवर माहिती देताना सांगितले. पत्रकार परिषदेदरम्यान बाबा रामदेव यांनी योग करण्याचे महत्व, योग कसा करता येतो, योगमुळे काय फायदे होतात याची प्रात्यक्षिके दाखविली