नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद 23 ऑगस्टला नवी दिल्लीत विज्ञान भवनात आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. पर्यटन मंत्रालयाने महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेश राज्य सरकारच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन केले आहे. 26 ऑगस्टपर्यंत ही परिषद चालणार असून महाराष्ट्रात अजिंठा, बिहारमध्ये राजगीर, नालंदा आणि बोधगया तर उत्तर प्रदेशमधल्या सारनाथ येथे 24 ते 26 ऑगस्टदरम्यान प्रतिनिधींना भेट देण्यासाठी नेण्यात येणार आहे.
बांगलादेश, इंडोनेशिया, म्यानमार आणि श्रीलंकेचे मंत्रीस्तरीय प्रतिनिधीमंडळ या परिषदेत सहभागी होणार आहे. ऑस्ट्रेलिया, भूतान, ब्राझीलसह 29 देशांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहेत.