नवी दिल्ली : अत्यंत वेगाने हल्ला करु शकणारी “आयएनएस तिलांचंग” ही नौका गुरुवारी(ता.९) नौदलाच्या सेवेत कारवार येथे दाखल झाली. नौदलाचे पश्चिम कमांड प्रमुख व्हाइस ॲडमिरल गिरीश लुथ्रा यांच्या हस्ते तिचे उद्घाटन झाले.
वॉटर जेट फास्ट ॲटक क्राफ्ट प्रकारच्या चार नौकांपैकी आयएनएस तिलांचंग ही तिसरी नौका आहे. याआधीच्या आयएनएस “तरमुग्ली” आणि “तिहायू” या २०१६ मध्ये नौदलाच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. त्यांना विशाखापट्टणम येथे ठेवण्यात आल्या आहेत. या नौका स्वदेशी बनावटीच्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने तिलांचंग नौका महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे व्हाइस ॲडमिरल लुथ्रा यांनी यावेळी सांगितले.