नवी दिल्ली : भारतीय नौदलाचे आयएनएस तरंगिणी हे जहाज जगभरात सात महिन्याचा प्रदीर्घ प्रवास करुन कोची इथल्या नौदलाच्या तळावर आज परतले. रिअर ॲडमिरल आर. जे. नाडकर्णी यांनी या निमित्त आयोजित कार्यक्रमात या जहाजाचे स्वागत केले.
लोकायन-18 या अंतर्गत 10 एप्रिलला कोची येथे तरंगिणीचा प्रवास सुरु झाला होता. 13 देशातल्या 15 बंदरांवर भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन या जहाजाने घडविले. अरबी समुद्र, लाल समुद्र, सुयेझ कालवा, भूमध्य समुद्र, जिब्राल्टर, उत्तर अटलांटिक महासागर, इंग्लिश खाडीमधून या जहाजाने प्रवास केला. थ्री फेस्टिवल टॉल शीप रिगाटा या फ्रान्समधल्या कार्यक्रमातही हे जहाज सहभागी झाले होते.
भारतीय नौदलाचे तरंगिणी हे पहिले प्रशिक्षण जहाज 11 नोव्हेंबर 1997 रोजी नौदलात दाखल झाले. 21 वर्षांच्या आपल्या दैदिप्यमान सेवेत या जहाजाने 2,20,000 सागरी मैल अंतर पार केले आहे.