मुंबई : इनलॅण्ड वर्ल्ड ल़ॉजिस्टीक्स या कंपनीचा नुकत्याच पार पडलेल्या अकराव्या एक्स्प्रेस, लॉजिस्टीक्स आणि सप्लाय चेन लीडरशीप पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट पुरवठा साखळी पुरस्काराने गौरव करण्यात आला. हा या क्षेत्रातला मानाचा पुरस्कार समजला जातो.
“ इनलॅण्ड वर्ल्ड लॉजिस्टीक्स या आमच्या कंपनीला मानाचा पुरस्कार मिळाला आहे, हा आमच्यासाठी बहुमान आहे. या यशाचे श्रेय कर्मचाऱ्यांनाच जाते. आमच्या दर्जेदार सेवा – सुविधांचा या पुरस्कारांमुळे मान राखला गेला आहे, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो,“ अशी प्रतिक्रिया इनलॅण्ड वर्ल्ड लॉजिस्टीक्सचे संचालक परवीन सोमानी यांनी दिली.