
आयकर परताव्याची तारीख जवळ आली असून तुम्हाला आर्थिक वर्ष २०१८-१९ (मूल्यांकन वर्ष२०१९-२०) साठी तुमचे उत्पन्न सूचित करावे लागेल आणि ३१ जुलै २०१९ च्या देय तारखेपर्यंत तुमचा आयकर परतावा दाखल करावा लागेल. जेव्हा आपले एकूण वार्षिक उत्पन्न २.५ लाखापेक्षा जास्त असेल तेव्हा आपल्याला आयकर परतावा भरणे आवश्यक आहे. ६० वर्षांपासून ८० वर्षांपर्यंतच्या व्यक्तींसाठी मर्यादा ३ लाख रूपये आणि ८० वर्षांवरील वरील व्यक्तींसाठी ५ लाख रुपये मर्यादा आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ (मूल्यांकन वर्ष २०१९-२०) चा आयकर परतावा भरण्याकरिता तुम्हाला कोणता आयकर फॉर्म वापरणे आवश्यक आहे याबद्दल माहिती देत आहेत क्लिअरटॅक्सचे संस्थापक आणि सीईओ श्री अर्चित गुप्ता.
१. आयटीआर-१: एक निवासी भारतीय ज्याला पगारातून उत्पन्न मिळते, एका घराची मालमत्ता आहे आणि बँकेच्या व्याजासारखे इतर उत्पन्न आहे ते आपला कर परतावा भरण्यास आयटीआर-१ वापरू शकतात. तसेच, या सर्व उत्पन्नांना वार्षिक एकूण उत्पन्न ५० लाख रुपयांसाठी सूचित केले जाऊ शकते. या कारणासाठी, तुमचे ‘एकूण उत्पन्न’ म्हणजे वरील सर्व स्त्रोतांमधून मिळालेले एकत्रित वार्षिक उत्पन्न असेल ज्यातून खालीलप्रमाणे तुमची कर कपात केली जाईल:
अ. वेतन भत्त्यांची वजावट
ब. घरकर्जाची परतफेड (व्याजाचे पेमेंटसहित)
क. भविष्य निर्वाह निधी, भरलेले एलआयटी प्रीमियम, वैद्यकीय विमा आणि इतर.
तुम्ही आयटीआर-१ मध्ये तुमचे वजा केलेले उत्पन्नही सूचित करू शकता जसे की लाभांश, पीपीएफचे व्याज, एलआयटी परिपक्वता मिळकत इ. हे उत्पन्न तुमच्या एकत्रित वार्षिक उत्पन्नाचा भाग नसेल.
२. आयटीआर-२: सर्व व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब (एचयुएफ) त्यांचा परतावा आयटीआर-२ मध्ये भरू शकतात. आयटीआर-१ हा वर नमूद साधारण बाबतीत भरण्याचा फॉर्म असल्याने, व्यक्ती आणि एचयुएफ इतर बाबतीत (व्यवसाय किंवा पेशापासूनच्या उत्पन्नाव्यतिरिक्त) आयटीआर-२ भरू शकतात. गणना करण्यास, खालील बाबतीत आयटीआर-२ भरणे आवश्यक आहे:
अ. ५० लाख रूपयांपेक्षा जास्त एकूण उत्पन्न असलेल्या व्यक्ती (निवासी आणि अनिवासी दोन्ही);
ब. अनिवासी व्यक्तींना आयटीआर-२ मध्ये त्यांचे उत्पन्न भरणे अनिवार्य आहे, एनआरआय व्यक्तींना भारतातील त्यांच्या वास्तव्याचे दिवस, त्यांचा निवासाचा देश आणि त्यांचा विदेशी करदाता ओळख क्रमांक प्रगट करणे आवश्यक आहे.
क. एखाद्या कंपनीचे (खाजगी किंवा सार्वजनिक) संचालक असलेल्या व्यक्तींना आयटीआर-२ दाखल करावे लागते. व्यवसायात किंवा पेश्यामध्येअसलेल्या लोकांनी आयटीआर -३ दाखल करावे;
ड. ज्या व्यक्तींजवळ त्यांच्या नावावर असूचीबद्ध इक्विटी समभागांमध्ये गुंतवणूकी आहेत त्यांना आयटीआर-२ दाखल करायचे आहे.व्यवसायात किंवा पेश्यामध्येअसलेल्या लोकांनी आयटीआर-३ दाखल करावे;
इ. एचयुएफनी आयटीआर-२ दाखल करावे (व्यवसायात किंवा पेश्यामध्येअसलेल्यांव्यतिरिक्त);
ई. व्यक्ती आणि एचयुएफ ज्यांना भांडवली लाभापासून उत्पन्न मिळते जसे की शेअर्स किंवा सिक्युरिटिज किंवा अचल संपत्तीच्या विक्रीमधून मिळालेला लाभ किंवा तोटा;
उ. घर संपत्तीमध्ये झालेले नुकसान सूचित करायचे असलेल्या व्यक्ती किंवा असे नुकसान ज्यांना पुढे न्यायचे आहे अशा व्यक्ती
ऊ. एका घर संपत्तीपेक्षा जास्त मालकी असलेले निवासी व्यक्ती
ए. विदेशी उत्पन्न आणि संपत्ती धारक व्यक्ती आणि विदेशात अदा केलेल्या करांसाठी क्रेडिटचा दावा करणाऱ्या व्यक्ती
३. आयटीआर-३: व्यवसाय किंवा पेशामधून उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्ती किंवा एचयुएफवर आयटीआर-३ लागू आहे. एकूण उत्पन्न ५० लाख रूपयांपेक्षा कमी असल्यावरही व्यवसाय किंवा पेशामधून उत्पन्न मिळवणा-या (यामध्ये भागीदारी किंवा एलएलपीमधल्या नफ्याचा हिस्साही सामील आहे) प्रत्येक व्यक्ती किंवा एचयुएफ करदात्याने त्यांचा कर परतावा आयटीआर-३ मध्ये भरणे आवश्यक आहे. आयटीआर-३ भरताना व्यक्ती किंवा एचयुएफने त्यांचा व्यापार, नफा व तोटा खाते, जीएसटी कायद्यातंर्गत उलाढाल आणि त्यांच्या व्यवसायाचा ताळेबंद सादर करणे आवश्यक आहे.
व्यक्ती किंवा एचयुएफ सर्व उत्पन्न आयटीआर-३ द्वारे सूचित करू शकतात जसे की वेतन, घर संपत्ती, व्यवसाय किंवा पेशा, भांडवली लाभ आणि इतर स्त्रोत.
४. आयटीआर-४: व्यवसाय किंवा पेशापासून उत्पन्न मिळणाऱ्या व त्यावर अनुमानित आधारे कर आकारला जाणा-या निवासी व्यक्ती, एचयुएफ आणि भागीदारी फर्म (एलएलपी व्यतिरिक्त) आयटीआर-४ मध्ये त्यांचा कर परतावा भरू शकतात. तसेच, आयटीआर-४ ला फक्त ५० लाखापर्यंतच्या एकूण उत्पन्नासाठी वापरता येते.
व्यावसायिक करदाते त्यांच्या व्यवसायातून (२ करोड रूपयापर्यंतच्या उलाढालीसाठी) ८% (बँकिंग चॅनलच्या माध्यमातून प्राप्तीमध्ये ६%) नफा म्हणून दाखवत अनुमानित आधारे त्यांचे व्यावसायिक उत्पन्न दाखल करू शकतात.
पेशेवर करदाते त्यांच्या पेशातून (५० लाखापर्यंतच्या ढोबळ प्राप्तीसाठी उपलब्ध) ढोबळ प्राप्तीच्या ५०% दाखवत त्यांचे पेशेवर उत्पन्न दाखल करू शकतात.
५. एओपी (असोसिएशन ऑफ पर्सन्स), बीओआय (बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स), एलएलपी, सहकारी सोसायटी, एजीपी (आर्टिफिशिअल जुरीडीकल पर्सन) असलेले करदाते आणि स्थानिक प्राधिकरणांना त्यांचा आयकर परतावा आयटीआर-5 मध्ये दाखल करायचा आहे.
६. आयटीआर-६: धर्मादाय किंवा धार्मिक उद्देशांसाठी धारण केलेल्या संपत्तीमधून झालेल्या उत्पन्नाचा दावा करणाऱ्या कंपन्यांव्यतिरिक्त इतर कॉर्पोरेट करदात्यांना त्यांचा आयकर परतावा आयटीआर-६ मध्ये दाखल करायचा आहे.
७. आयटीआर-७: कलम १३९ (४ए) ते १३९ (४डी) अंतर्गत येणारे ट्रस्ट, गैर-नफा संस्था, महाविद्यालये, गूंतवणूक फंड्स इत्यादींचा समावेश असलेल्या करदात्यांना त्यांचा आयकर परतावा आयटीआर-७ मध्ये भरणे आवश्यक आहे.














