
नाशिक (प्रतिनिधी) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा करण्यात आला. मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमात विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलतांना मा. कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जीवनकार्याची महत्वपूर्ण दिली. उपस्थित सर्वांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. किशोर शिंदे यांनी केले. यावेळी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील, विद्यार्थी कल्याण व बहिःशाल केंद्र प्रमुख डॉ. दयाराम पवार यांच्यासह विद्याशाखा संचालक, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी – कर्मचारी, शैक्षणिक संयोजक, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















