मुंबई, 28 मे : लॉकडाउनच्या काळात नव्या यूझर्सना ऑनलाइन लर्निंगकडे आकर्षित करण्यामध्ये शाळांनी मोठी भूमिका बजावली. भारतात ३२० दशलक्ष विद्यार्थी यामुळे प्रभावित झाले. ब्रेनली विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठीचा जगातील सर्वात मोठा ऑनलाइन लर्निंग मंच असून याने भारतात नव्याने लोकप्रिय होणा-या एडटेक मंचामध्ये मोठे यश मिळवले आहे. सिमिलर वेबच्या मागील आठवड्यातील आकडेवारीनुसार, ब्रेनलीने एप्रिलमध्ये सर्वाधिक वेबसाइट ट्रॅफिक नोंदवली. भारतीय एडटेक ट्रॅफिकपैकी जवळपास ४.१९% म्हणजेच २५.०५ दशलक्ष लोकांनी भेट दिली.
ब्रेनलीने भारतीय यूझर्समध्ये २५ दशलक्षांची वाढ नोंदवली असून तो भारतीय एडटेक मंचाचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे. हे त्यांच्या ज्ञान आदान-प्रदानाच्या कम्युनिटी लर्निंग मॉडेल तसेच मजबूत आंतरराष्ट्रीय उपस्थितीमुळे शक्य झाले आहे.
ब्रेनलीचे सहसंस्थापक आणि सीईओ मिशल बोर्कोव्हस्की म्हणाले, ‘ सध्याचे दिवस विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी खरोखरच आव्हानात्मक आहेत. संपूर्ण जग वेगाने ऑनलाइन लर्निंगकडे वळताना आपण पाहत आहोत. भारतातील एडटेक प्रवेशास ही घडामोड अधिक प्रोत्साहन देईल आणि महामारी गेल्यानंतरही ही साधनं, प्लॅटफॉर्मस आपल्यासोबत राहतील, असा मला विश्वास आहे. घरात राहून शिकण्याला ब्रेनलीने अभूतपूर्व आधार दिला आहे, ते भारतातील लाखो कुटुंबांसाठी उपयुक्त ठरत आहे.’