नवी दिल्ली: लष्करातील महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती ही तेथील गरजा, लढण्याची क्षमता आणि तिथले कामकाज यावर आधारित आहे. सध्या लष्करात महिलांची नियुक्ती लघु सेवा आयोगामार्फत (एसएससी) केली जाते. लष्करातील महिलांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ दिसून येत आहे. लष्करात महिलांची बटालियन उभारण्याचा प्रस्ताव नाही. लष्करात महिलांना पुरुष अधिकाऱ्यांप्रमाणेच कामे दिली जातात. नौदल आणि हवाई दलातही महिला अधिकाऱ्यांना पुरुष अधिकाऱ्यांचे नियम लागू होतात. नौदलात पायलट म्हणून महिलांची नियुक्ती करायला सरकारने मंजुरी दिली आहे. संरक्षण दलाच्या तीनही विभागात लैंगिक समानता आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी काल लोकसभेत ही माहिती दिली.