मुंबई : झपाट्याने वाढणाऱ्या, पाण्याची टंचाई असलेल्या शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याचे विकेंद्रित उपाय अवलंबण्यासाठी व त्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी आयोजित केलेल्या अर्बन ड्रिंकिंग वॉटर चॅलेंज या नावीन्यविषयक जागतिक स्पर्धेचे 2018 या वर्षासाठीचे निकाल इमॅजिन H2O आणि फाउंडिंग पार्टनर्स ब्लुवॉटर ग्रुप व इलेवन्थ अवर रेसिंग यांनी जाहीर केले आहेत. 37 देशांतील एकूण 160 अर्जदारांनी या आव्हानासाठी नोंदणी केली होती. स्मार्टटेरा (बेंगळुरू, भारत), ड्रिंकवेल (ढाका, बांगलादेश) व मायक्रोलाइझ (डेन्व्हर, सीओ) या विजेत्या कंपन्या, शहरी भागातील पाण्याचे दुर्भिक्ष्य संपुष्टात आणण्यासाठी व यून शाश्वत विकास उद्दिष्ट 6च्या दिशेने वाटचाल करण्यासाठी वैविध्यपूर्ण तंत्रज्ञान व उद्योजकतेच्या दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करतात.
या आव्हानाच्या फाउंडिंग पार्टनर्सनी एक दशलक्ष डॉलरपर्यंत रोख बक्षीस, प्रायोगिक फंडिंग पुरस्कार व गुंतवणूक देण्याचे ठरवले आहे. ऑगस्ट 26 – 31, 2018 या कालावधीत, जागतिक जल सप्ताहादरम्यान, स्टॉकहोममध्ये प्रत्येक विजेता दर्शवला जाईल. “पुढील तीन दशकांमध्ये, शहरांची पाण्यासाठीची मागणी 70% वाढण्याची व पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईची सामना करत असलेल्या केप टाउनसारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे,” असे ब्लुवॉटरचे अध्यक्ष व चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर अँडर्स जेकोब्सन यांनी सांगितले. “या स्पर्धेच्या निमित्ताने, झपाट्याने होत असलेले शहरीकरण व पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या समस्येचे सावट या धर्तीवर पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त ठरतील असे तीन उपयुक्त उपाय योजण्यासाठी संसाधनो समोर मांडली जातील.”
व्यावसायिक किफायतशीरता, परिणाम व बाजारात उतरण्याची तयारी या निकषांच्या आधारे मूल्यमापन करून निवडण्यात आलेल्या विजेत्या स्टार्टअपनी पिण्याच्या पाण्याच्या सेवेची व्याप्ती व शाश्वतता वाढवण्यासाठी नावीन्यपूर्ण बिझनेस मॉडेलची तंत्रज्ञानाशी सांगड घातली आहे.
स्मार्टटेरा ही कंपनी अपुरी सेवा मिळत असलेल्यांना सेवा मिळण्याच्या दृष्टीने, माहितीच्या आधारे निर्णय घेण्यासाठी व कार्यपद्धतीसाठी भारतातील सेकंड-टिअर शहरांना साधने देत आहे. ‘ड्रिंकवेल ‘ बांगलादेशातील आर्सेनिक-प्रदूषित समुदायांसाठी आपल्या विकेंद्रित जल शुद्धीकरण व्यवस्थेमध्ये विस्तार करत आहे. ‘मायक्रोलाइझ ‘ घरांना सबल करण्यासाठी व यूएस युटिलिटीजची किफायतशीर पाहणी करण्यासाठी रिअल-टाइम पाणी चाचणी उपकरणे बसवत आहे.
इमॅजिन H2Oच्या मूल्यमापन समितीमध्ये जागतिक बँक, ग्रुंडफॉज, द श्मिड्ट फॅमिली फाउंडेशन, अनेर्जिया रोटोप्लास, झिलेम, अॅक्वाया इन्स्टिट्यूट आणि वॉटर अँड सॅनिटेशन फॉर अर्बन पूअर अशा संस्थांतील तज्ज्ञांचा समावेश होता.
“इलेव्हन्थ अवर रेसिंग नावीन्याच्या मार्फत जागतिक पाणी समस्येवर उपाय करण्यासाठी प्रयत्नशील आहे,” असे इलेव्हन्थ अवर रेसिंगचे कार्यक्रम संचालक टोड मॅकग्युरी यांनी सांगितले. “जगभरातील विविध समुदायांसमोर असलेल्या समस्या समजून घेणाऱ्या उद्योजकांवर प्रकाश टाकला असता, पाण्याच्या बाबतीत सुरक्षित भविष्याच्या दृष्टीने आपण त्यांचा क्रम लावू शकतो व आपल्या एकत्रित प्रयत्नांना आणखी चालना देऊ शकतो.”
याबरोबरच, या आव्हानाच्या मूल्यमापन समितीने माजिक वॉटर या स्थानिक समाजाच्या मदतीने अॅटमोस्फेरिक जलनिर्मिती उपकरण निर्माण करणाऱ्या नैरोबीतील टीमचा विशेष उल्लेख केला.