नवी दिल्ली – स्वदेशी बनावटीची पाणबुडी विरोधक आयएनएस किल्टान ही नौका विशाखापट्टणम येथील नेव्हल डॉकयार्ड नौदलात नुकतीच दाखल झाली.येथे संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण, नौदलप्रमुख ॲडमिरल सुनील लांबा आणि नौदलाच्या पूर्व विभागाचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल एचसीएस बिश्त यावेळी उपस्थित होते.
भारतीय नौदल संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचे संरक्षणमंत्र्यांनी कौतुक केले. देशाच्या संरक्षण गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच आधुनिकीकरणासाठी सरकार निधी कमी पडू देणार नाही, असे त्यांनी सांगितले. 109 मीटर लांबीची आणि 14 मीटर रुंदीची ही नौका असून, शत्रूचा माग घेणारी तसेच क्षेपणास्त्र नष्ट करणारी अत्याधुनिक यंत्रणा या पाणबुडी विरोधक युद्धनौकेवर आहे.