
मुंबई, (निसार अली) : मार्वे येथील आयएनएस हमला येथे कारगिल युद्धाच्या विजय दिवसानिमित्त भारतीय नौदलाकडून हुतात्मा शूर सैनिकांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. कमांडीगं ऑफिसर यांनी वॉर मेमोरियल येथे पुष्प अर्पण केले.
कारगिल विजय दिवसानिमित्त 2O जुलैपासून आठवडाभर नौदलाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय विद्यालय हमला येथे चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन भरवण्यात आले आहे. नौदल जवानांच्या कुटुंबियांनी व जवानांनी वृक्षारोपण केले, अशी माहिती लेफ्टनंट बी. एस. यादव यांनी दिली. 27जुलै ला या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
पिनाकल शाळा मालाड, बालाजी इंटरनॅशनल शाळा, केंद्रीय विद्यालयाचे विद्यार्थी आणि नागरिकांसाठी नौदलाच्या बँडच्या माध्यमातून देशभक्ती पर गीतांचा कार्यक्रम झाला.
















