मुंबई, ९ जून २०२१: आज मार्केट अस्थिर सत्रानंतर तीव्र घसरणीवर स्थिरावले. पीएसयू बँक, मीडिया, रिअॅलिटी शेअर्सने या नुकसानीचे नेतृत्व केले. निफ्टीने निचांकी सुरुवात केल्यानंतर सुधारणा घेत १५,८०० ची पातळी गाठली. त्यानंतर इंडेक्स पुन्हा उच्चांकी स्थितीत काहीसा स्थिर राहिला. मात्र दुपारनंतर विक्रीचा दबाव वाढल्यानंतर निर्देशांक लाल रंगात घसरले. तथापि, ट्रेंड पॉझिटिव्ह राहिला. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की, निर्देशांक उच्चांकी पातळीवर संघर्ष करत होता. त्यामुळे त्यानंतर तीव्र घसरण घेत निफ्टी १५० अंकांनी घसरला. तर निफ्टी बँक इंडेक्स सलग दुसऱ्या सत्रात घटला. दिवसभरात ६०० अंकांची घसरण घेतल्यानंतर निर्देशांकाने उच्चांकी पातळीवर प्रॉफिट बुकिंगचा अनुभव घेतला.
ब्रॉडर मार्केट मूव्हमेंट: ब्रॉडर मार्केटचा विचार करता, मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी त्यांच्या ताज्या परफॉर्मन्संतर काहीशी विश्रांती घेतली. निर्देशांत दिवसभरातील उच्चांकी स्थितीनंतर २ टक्क्यांनी घसरले आणि निचांकी स्थितीवर विसावले. तर सेक्टरनिहाय आघाडीवर सर्व सेक्टर्स नकारात्मक स्थितीत थांबले. निफ्टी मिडिया इंडेक्स हा सर्वाधिक लूझर ठरला आणि २ टक्क्यांपेक्षा जास्त घसरला. आयटी आणि एफएमसीजी सेक्टरवर फार कमी परिणाम झाला. स्टॉकच्या पातळीवर पाहता, निफ्टी५० च्या पॅकपैकी ५० पैकी ३८ स्टॉक लाल रंगात स्थिरावले. टाटा मोटर्स आणि अदानी पोर्ट्स हे टॉप लूझर्स असल्याने २ टक्क्यांपेक्षा जास्त घसरले. तर पॉवर ग्रिड आणि एसबीआय लाइफ हे दिवसभरातील टॉप गेनर्स ठरले.
बातम्यांतील स्टॉक्स: टाटा पॉवरचा शेअर आज १२ टक्क्यांनी वाढला. त्याने ५२ आठवड्यातील उच्चांक इंट्राडेदरम्यान गाठला. वाजवी व्यापार नियामक सीसीआयने ओडिशामधील तीन पॉवर युटिलिटीजमधील ५१ टक्के भाग खरेदी करण्याच्या कंपनीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर हे परिणाम दिसून आले.
जागतिक आकडेवारीच्या आघाडीवर: जागतिक आघाडीवर, जागतिक गुंतवणूकदारांनी या आठवड्यात जाहीर होणाऱ्या आर्थिक आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली. तर अमेरिकेत, बेंचमार्क निर्देशांक फ्लॅट स्थितीत थांबले. कारण या आठवड्यानंतर कंझ्युमर इन्फ्लेशन डेटाच्या प्रतीक्षेत बाजार आहे. युरोपमध्ये, एफटीएसई, डीएएक्स आणि सीएसी ४० निर्देशांकांनी युरोपियन सेंट्र बँक (ईसीबी) च्या धोरणात्मक निर्णयानंतर खाली घसरले.
तात्पर्य म्हणजे, निफ्टी सलग दुसऱ्या दिवशी घसरला. साप्ताहिक एफअँडओ एक्सपायरीमुळे अस्थिर व्यापार दिसून आल्याने सुरुवातीचा नफा कमी झाला. त्यामुळे निफ्टी १०४ अंकांनी घसरून १५६३५ अंकांवर स्थिरावला. तर ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ५२००० च्या खाली ३३३ अंकांनी घसरून ५१९४१ अंकांवर थांबला. उद्या साप्ताहिक मुदत संपत असल्याने निफ्टी अपसाइड १५८०० आणि डाऊनसाइड १५५०० या पातळ्यांवर लक्ष ठेवावे लागेल.