वेस्टर्न ऑस्ट्रेलिया देत असलेल्या विविध संधी दाखवण्यासाठी ७-दिवसीय इंडिया ट्रेड मिशनचा भाग म्हणून डेप्युटी प्रिमियर माननीय रॉजर कूक यांची दिल्ली व मुंबईला भेट
• यंदा वर्षाच्या उत्तरार्धात खेळवण्यात येणा-या आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कपनिमित्त ऑस्ट्रेलियाच्या सर्वात मोठ्या राज्याला भेट दिलीच पाहिजे असे गंतव्य म्हणून चालना देण्याच्या मिशनचा भाग म्हणून टूरिझम डब्ल्यूएने (वेस्टर्न ऑस्ट्रेलिया) भारतात वेस्टर्न ऑस्ट्रेलियन क्रिकेटिंग लीजेण्ड ब्रॅड हॉगला आणले
• प्रमुख ट्रॅव्हल, मीडिया व एव्हिएशन भागधारकांशी संलग्न होण्यासाठी टूरिझम वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या मॅनेजिंग डायरेक्टर कॅरोलिन टर्नबुल यांचा मिशनमध्ये समावेश
मुंबई, १५ जुलै २०२२: माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट स्टार ब्रॅड हॉग यांनी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे (डब्ल्यूए) डेप्युटी प्रिमियर व मिनिस्टर फॉर टूरिझम माननीय रॉजर कूक आणि टूरिझम डब्ल्यूएच्या मॅनेजिंग डायरेक्टर कॅरोलिन टर्नबुल यांच्यासोबत यंदा वर्षाच्या उत्तरार्धात खेळवण्यात येणा-या आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कपनिमित्त ऑस्ट्रेलियाच्या सर्वात मोठ्या राज्याचा प्रचार करण्याकरिता दिल्ली व मुंबईमधील बैठका व कार्यक्रमांसाठी सहयोग केला आहे.
आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान, ब्रॅड हॉग यांनी क्रिकेटच्या सर्व गोष्टींबद्दल सांगितले, ज्यामध्ये बहुप्रतिक्षित आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कप ते २००३ वर्ल्ड कपमध्ये त्यांनी बाद केलेल्या अँडी फ्लॉवरच्या कुप्रसिद्ध विकेटचा समावेश आहे. ब्रॅड यांनी पर्थमधील त्यांची आवडती ठिकाणे देखील शेअर केली आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (डब्ल्यूए) हे क्रिकेटप्रेमी, प्रवासी आणि साहसांचा शोध घेणा-यांसाठी अनुकूल गंतव्य का आहे याबाबत सांगितले.
ब्रॅड व उपप्रधानमंत्री यांनी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे स्वत:चे ‘व्हेन्यू ऑफ द इअर’ – पर्थ स्टेडियम दाखवले, जेथे चार महिन्यांमध्ये खेळवण्यात येणा-या भारत वि. दक्षिण आफ्रिका सामन्यासोबत अनेक महत्त्वाचे सामने खेळवण्यात येतील.
२०१९ पासून वेस्टर्न ऑस्ट्रलियन सरकारच्या पहिल्या अधिकृत भेटीमध्ये डेप्युटी प्रिमियर यांच्या नेतृत्वांतर्गत मिशनमध्ये दिल्ली, विजयवाडा आणि चेन्नई येथे मंत्रिस्तरीय बैठका, ग्रुप ब्रीफिंग्ज, उद्योग गोलमेज, वन-टू-वन बिझनेस मॅचिंग आणि नेटवर्किंग इव्हेंट्सचा समावेश आहे.
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया देत असलेल्या सर्व गोष्टींबाबत अधिक माहितीसाठी www.westernaustralia.com येथे भेट द्या.
*डेप्युटी प्रिमियर, मिनिस्टर फॉर स्टेट डेव्हलपमेंट, जॉब्स व ट्रेड; टूरिझम;* कॉमर्स; सायन्स, माननीय रॉजर कूक म्हणाले:
”भारत डब्ल्यूएसाठी प्राधान्य बाजारपेठ आहे आणि मला व्यक्तिश: प्रमुख सहयोगी व भागधारकांना भेटण्यासाठी या ट्रेड मिशनचे नेतृत्व करण्याचा आनंद होत आहे.”
वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे पुनरागमन पाहता आम्हाला मे महिन्यामध्ये डब्ल्यूए आगमनांसह भारतामधून सर्वाधिक पर्यटक येताना पाहायला मिळाले. हे प्रमाण कोविड-पूर्व काळाच्या ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहे आणि जुलै व ऑगस्टसाठी बुकिंग्ज महामारीपूर्वीच्या काळापेक्षाही अधिक आहेत.
वेस्टर्न ऑस्ट्रेलियन सरकार भारतातून थेट वेस्टर्न ऑस्ट्रेलियापर्यंत विमानचालन सुविधेला प्रमुख प्राधान्य देत आहे, यामुळे दोन्ही गंतव्यांमध्ये पर्यटन व गुंतवणूकीसाठी अधिक संधी निर्माण होतील आणि भारतातील पर्यटकांना वेस्टर्न ऑस्ट्रेलियामधील त्यांच्या प्रियजनांना भेटण्यास मदत होईल. तसेच यामुळे डब्ल्यूए पर्यटन व निवासव्यवस्था व्यवसायाला मोठी उसळी मिळेल.
टूरिझम डब्ल्यूएच्या संशोधनामधून निदर्शनास येते की, भारतातील पर्यटक विशेषत: निसर्ग व वन्यजीवन, आकर्षक किनारपट्टी भाग, समुद्रकिनारे व जलीय वन्यजीवन, स्थानिक पाककला आणि कुटुंबास अनुकूल गंतव्याला भेट देण्यासाठी उत्सुक आहेत. वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये या सर्व गोष्टी आहेत.”
*टूरिझम वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या मॅनेजिंग डायरेक्टर कॅरोलिन टर्नबुल म्हणाल्या:*
”भारतात आमचे उत्तमरित्या स्वागत करण्यात आले आहे आणि आम्ही भारतातील पर्यटकांना साहसी कृत्यांचा आनंद देण्यासाठी प्रमुख पर्यटन व मीडिया संपर्कांसोबत संलग्न होण्यास, तसेच एव्हिएशन भागधारकांसोबत बैठक घेण्यास उत्सुक आहोत.
मिशनचा आणखी एक फोकस वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या ब्लॉकबस्टर इव्हेण्ट्सचा, विशेषत: पर्थमध्ये खेळवण्यात येणा-या आगामी आयसीसी मेन्स टी२० सामन्यांचा प्रचार करण्यावर राहिला आहे. ऑक्टोबरमध्ये आमच्या जागतिक दर्जाच्या पर्थ स्टेडियममध्ये भारताचा राष्ट्रीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेसोबत सामना खेळणार आहे.
डब्ल्यूएचे कॉस्मोपॉलिटन राजधानी शहर पर्थमधील इव्हेण्ट्स आमच्या सुंदर राज्याचा आनंद घेण्यासाठी अभ्यागतांसाठी उपलब्ध असलेल्या कृत्यांच्या अविश्वसनीय श्रेणीशी पूरक आहेत. डब्ल्यूएच्या साऊथवेस्टमधील आकर्षक जंगल व वाइन प्रदेश असो किंवा कोरल कोस्टलगतचे आमचे मूळ समुद्रकिनारे असो आम्ही वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये सर्वांना सुखद अनुभव मिळेल असे गंतव्य असण्याबाबत प्रचार करण्यासाठी या मिशनचा वापर करत आहोत.”