
नवी दिल्ली : भारताचे चौदावे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद निवडून आले. राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक झाली होती. यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून कोविंद उभे होते. आज झालेल्या मतमोजणीत ते प्रचंड मताधिक्याने निवडून आले. त्यांच्या विरोधात संयुक्त पुरोगामी आघाडीच्या मीरा कुमार यांनी निवडणूक लढविली होती. आज सकाळपासून संसदभवनात मतमोजणीला सुरुवात झाली. संध्याकाळी निकाल हाती आला.
रामनाथ कोविंद हे मूळचे उत्तरप्रदेशातील कानपूरचे आहेत. १ ऑक्टोबर १९४५ रोजी त्यांचा जन्म झाला. वकील असलेल्या कोविंद यांनी दिल्ली उच्च न्यायालयात काम केले आहे.