
रत्नागिरी, (आरकेजी) : देशभरात पेट्रोल, डिझेलच्या किमतीत १६ जूनपासून दररोज बदल होणार आहे. तसा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाला पेट्रोलपंप चालकांनी तीव्र विरोध केला आहे. सरकारचा हा निर्णय म्हणजे देशभरातील ५३ हजार डिलर्सना देशोधडीला लावणारा आहे, अशी प्रतिक्रिया फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली आहे.
पेट्रोलियम पदार्थांच्या दरात दररोज बदल करण्याची शिफारस तज्ज्ञांच्या समितीने सरकारला केली होती. परदेशात तशी पद्धत आहे. मात्र सरकारने हा निर्णय देशात लागू करताना डिलर्स संघटनांशी कोणतीही चर्चा केलेली नाही.परदेशातल्या एखाद्या निर्णयाची कॉपी करायची आणि आपण काहीतरी प्रगती केलीय असे दाखवायचे, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची टीका लोध यांनी केली आहे.
सरकारच्या या निर्णयाविरोधात पेट्रोल डिलर्स असोसीएशनने काही दिवसात भूमिका स्पष्ट करे, असे लोध म्हणाले आहेत.