मालाड ,ता.9 (प्रतिनिधी) : मालाड पश्चिम वॉर्ड क्रमांक 32 मध्ये दिनांक 9 जुलै रोजी हिंदुस्तान पेट्रोलियम पंप, राठोडी गाव , मार्वे रोड, मालाड (प) इथे पेट्रोल,डिझेल आणि घरगुती गॅसच्या अन्यायकारक दरवाढीविरूद्ध काँग्रेसने निदर्शेने केली. केंद्रातील भाजपा सरकारविरुद्ध निदर्शने करुन केलेली दरवाढ तात्काळ मागे घ्यावी व कोरोनामुळे अगोदरच संकटात सापडलेल्या सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
मुंबई काँग्रेस महासचिव नॅकसन नाटके, ब्लॉक अध्यक्ष विक्रम कपूर, मॉरिस किणी, मारिओ ग्रेसीएस, माजी नगरसेविका स्टेफी किणी व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबई काॅंग्रेस अध्यक्ष भाई जगताप, कॅबिनेट मंत्री अस्लम शेख व उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष कालू बुधेलिया यांच्या मार्गदर्शनानुसार इंधन दरवाढीविरोधात हे आंदोलन करण्यात आले.















