मुंबई, ३ जून २०२१: एसजीएक्स निफ्टीने सकारात्मक ओपनिंग दिल्यानंतर मार्केट सकारात्मक स्थितीत सुरु झाले. याचप्रमाणे इतर आशियाई बाजारातील स्थिती होती. एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे मुख्य सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आज निफ्टी आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर ओपन झाला आणि त्यानंतर या इंडेक्सने आणखी मजबुतीची प्रक्रिया सुरु केली. सत्राच्या अखेरच्या तासात इंडेक्सने साइडवेज ट्रेंड मोडत आतापर्यंत इंट्राडेमधील सर्वोच्च १५,७०५ पातळी गाठली. निफ्टीने सर्वोच्च पातळी गाठण्यापूर्वी घसरणीनंतर जवळपास १०० अंकांचा नफा कमावला. सलग दोन दिवस निफ्टी नफ्यात राहिला. व्हीआयएक्स इंडेक्समध्ये ८ टक्क्यांपेक्षा जास्त घट दिसल्याने या प्रक्रियेला आणखी प्रोत्साहन मिळाले. निफ्टी बँक इंडेक्सने दिवसातील घट अनुभवल्यानंतर जवळपास ३०० अंकांची सुधारणा केली. या समूहाचे नेतृत्व हेवीवेट एचडीएफसी बँकेने केले.
ब्रॉडर मार्केट मूव्हमेंट: ब्रॉडर मार्केट पाहता, निफ्टी मिडकॅप इंडेक्सने सर्वोच्च पातळी गाठत १ टक्क्यांचा नफा कमावला. तर निफ्टी स्मॉलकॅप इंडेक्स १ टक्क्यांनी वाढला. निफ्टी ऑटो इंडेक्सने काल काही टक्के नफा कमावला, कारण मदरसन सुमीने मजबूत वृद्धी दर्शवली. मात्र आजच्या सत्रात या इंडेक्समध्ये फार बदल झाला नाही. निफ्टी फार्माने तीन दिवसांची विजयी घोडदौड आज गमावली. याव्यतिरिक्त इतर सेक्टर्सनी हिरव्या रंगात विश्रांती घेतली. टायटनने ७ टक्क्यांचा नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला. ओएनजीसी आणि आयशर मोटर्सन हे दिवसभरातील टॉप गेनर्स ठरले. तर इंडसइंड बँक, विप्रो आणि सिपला हे निफ्टी समूहातील टॉप लूझर्स ठरले.
बातम्यांतील स्टॉक्स: आजच्या बातम्यांत झळणारे स्टॉक पाहता, मुथूट फायनान्सने, मागील दोन सत्रांच्या तीव्र घसरणीनंतर ५२ आठवड्यांतील सर्वोच्च पातळी गाठली. कंपनीच्या क्यू४ पीएटीमध्ये २२ टक्के वृद्धी दिसून आली. तर दुसरीकडे विप्रो ही टीसीएस आणि इन्फोसिसनंतर ३ ट्रिलियन मार्केट कॅपिटल असलेली तिसऱ्या क्रमांकाची कंपनी ठरली. हा स्टॉक दिवसभरात ४ अंकांनी घसरला.
जागतिक आकडेवारी: जागतिक बाजाराच्या आघाडीवर, सर्व तीन प्रमुख वॉल स्ट्रीट इंडेक्स काहीसे नफ्यात स्थिरावले. या आठवड्यानंतर नॉन-फार्म पेरोलची आकडेवारी जाहीर होणार असून त्यावर सर्वांची नजर आहे. तर युरोपियन बाजाराने लाल रंगात व्यापार केला, एफटीएसई १०० इंडेक्स १ टक्क्यांनी खाली घसरला. एकूणच, बेंचमार्क निर्देशांक आज सकारात्मक स्थितीत दिसले. ३०-शेअर बीएसई सेन्सेक्सने विक्रमी क्लोजिंग लेव्हल गाठली. सेन्सेक्सने ३८३ अंक किंवा ०.७४ टक्क्यांची वृद्धी घेत ५२,२३२ ची पातळी गाठली. निफ्टीने १५,६९० ची पातळी गाठली. यासाठी ११४ अंक किंवा ०.७३ टक्क्यांची वृद्धी घेतली.
आज निफ्टीने सर्वोच्च पातळी गाठली. या इंडेक्सने १५७०० ची पातळी ओलांडल्यास ही गती १५,७५०- १५८०० पातळीपर्यंत कायम राहिल. तर १५४५०-१५४०० हा मजबूत सपोर्ट गृहित घरला जाईल. उद्या आरबीआयचे पॉलिसी स्टेटमेंट बाजारातील भागीदारांकडून बारकाईने अभ्यासले जाईल. याद्वारे अर्थव्यवस्थेतील पुढील संकेत मिळू शकतील.