मुंबई : अभिनेता इंदर कुमार याचे वयाच्या ४३ व्या वर्षी हृद्याच्या तीव्र झटक्याने आज निधन झाले. अंधेरीतील चार बंगला येथील घरात असताना मध्यरात्री बारा वाजून ३० मिनिटांनी त्याला हृद्याचा झटका आला. यारी रोड येथील स्मशानभूमीत आज सायंकाळी सहा वाजता इंदरवर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
इंदर कुमार याने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. विशेष करून सलमान खानसोबत काही प्यार ना हो जाये, तुमको ना भूल पाएंगे, वॉन्टेड या चित्रपटांत त्याने अभिनयाची छाप पाडली होती. एकता कपूरच्या क्यो की सास भी कभी बहू थी या दूरचित्रवाणी वाहिनीवरील मालिकेतही त्याने भूमिका केली होती.