मुंबई : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय येथे ध्वजारोहण समारंभाची रंगीत तालिम आज घेण्यात आली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पडवळ, एस. जयकुमार, परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त अभिषेख त्रिमुखे, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सतीश जोंधळे यांच्यासह विविध मंत्रालयीन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासह पोलीस दलाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.