मुंबई : देशाचा स्वातंत्र्यदिन मुलुंडमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पश्चिमेकडील मेहुल सर्कल जवळ खास पद्धतीने ध्वजारोहण करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागप्रमुख राजेश चव्हाण यांनी घेतलेल्या या कार्यक्रमासाठी वाघा बॉर्डर ची प्रतिकृती तयार करण्यात आली होती.
भारतीय सैनिक आणि त्यांचे देशासाठी असलेले योगदान ही भारतीयांसाठी नेहमीच अभिमानाची गोष्ट ठरली आहे. यालाच अनुसरून ही प्रतिकृती तयार करण्यात आली होती. मनसेचे नेते शिरीष सावंत यांनी ध्वजारोहण करण्यात आले. या ठिकाणी अमर जवान स्मारक देखील उभारण्यात आले होते. पीएसआय विक्रम पाटील आणि एपीआय वारके यांनीही उपस्थिती दर्शवली होती. राष्ट्रपती पुरस्कार विजेते असलेले स्काऊट गाईड यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.