
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त रत्नागिरीचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. रत्नागिरीच्या पोलिस ग्राऊंडवर हा सोहळा पार पडला. पालकमंत्री आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजाला मानवंदना 9दिली गेली. पोलिस दलासह होमगार्ड,शालेय विद्यार्थी यांनी दिमाखदार संचलन केले. या सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरलं ते महिला पोलिसांचे संचलन. हा सोहळा पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांच्या श्वानाने दिलेली मानवंदना सर्वांच्या कुतुहलाचा विषय ठरली.
यावेळी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्वरुपा साळवी आदी मान्यवर उपस्थित होते. तिरंग्याला मानवंदना देण्यात आल्यानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ठ अधिकारी, कर्मचारी, देशसेवेसाठी कामगिरी बजावलेले जिवरक्षक, विद्यार्थी, शाळा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस उपअधिक्षक गणेश इंगळे यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी शासनाच्या वतीने नेमण्यात येणा-या युवा माहिती दूत यांच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.