मालाड, (निसार अली) : देशाचा स्वातंत्र्य दिन मालाडमधील मालवणी विभागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. खारोडी येथील दौलत शाळेने इयत्ता दहावीत शाळेतून प्रथक क्रमांक पटकावणाऱ्या फैजान मनिहार या विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण केले. मुख्याध्यापक गजानन झाड़े यावेळी उपस्थित होते.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मालवणी गेट क्रमांक ६ येथील पक्ष कार्यालयासमोर सार्वजनिकरित्या ध्वजारोहण केले. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. गेट क्रमांक ७ मालवणी येथील जामा मशीदितही स्वातंत्र्य दिन साजरा झाला.