
मुंबई, (निसार अली) : वांद्रे पश्चिम येथील सेंट तेरेसा बॉईज हायस्कूलमध्ये भारताचा 73 वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या सिनियर क्लार्क प्रेसिला मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. इयता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांनी बनविलेले तिरंगा झेंडे, राख्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
दहावी मार्च 2019 परीक्षेत शाळेतून पहिल्या आलेल्या तीन विद्यार्थ्यांना व स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धातील विजेते विद्या्र्थ्यांना बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात आले. देशभक्तीपर गीते व नृत्य सादर करण्यात आले. स्वच्छतेचे महत्व समजावून सांगण्यात आले. रक्षाबंधनाचे महत्व विषद राखी बांधून आम्ही भारतवासी एक आहोत हा संदेश यावेळी देण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक फादर निकी, एडमिन मॅनेजर फादर विनोद, उपमुख्याध्यापिका मारिया पॉल मॅडम व पर्यवेक्षिका जसिंथा लोपीस मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.