मुंबई, १ जून २०२१: मागील आठवड्यापासून स्पॉट गोल्डच्या दरांनी गती घेतली. सोमवारी त्यात ०.२ टक्क्यांची सुधारणा झाली आणि ते १९०६ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. डॉलरमधील घट आणि संभाव्य महागाईच्या चिंतेमुळे हे परिणाम दिसून आले असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
सोने हे महागाईवर उतारा म्हटले जाते. अमेरिकेतील अर्थव्यवस्था सुरु झाल्याने डोमेस्टिक डिमांड वाढली. परिणामी अमेरिकी कंझ्यूमर प्राइस इंडेक्स एप्रिल 2021 मध्ये वाढल्याने सोन्याने उच्चांकी व्यापार केला. अमेरिकेच्या चलनात घट झाल्याने सलग दुसऱ्या आठवड्यात इतर चलनांच्या तुलनेत घसरण झाली. यामुळे इतर चलनधारकांना सराफा धातू अधिक आकर्षक वाटला.
यासोबतच अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न कमी झाल्याने सोन्याला आणखी आधार मिळाला. तथापि, जगभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु झाली व प्रमुख अर्थव्यवस्था सुरु होत असल्याने सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्यावर दबाव आला.