– व्हीआयसीचे व्हीआयएल हे व्हर्च्युअल असिस्टंट आता व्होडाफोन आयडिया वेबसाइट, अॅप्स व व्हॉट्सअॅप यावर लाइव्ह
– ग्राहकांना सेवांचा लाभ घेणे शक्य होणार आणि त्यांना डिजिटल पद्धतीने सेवा दिली जाणार
– व्हीआयएलबरोबरच्या भागीदारीमार्फत स्टील्थ मोड स्टार्ट-अप ओरिसर्व्हच्या अत्याधुनिक एआयवर आधारित सेवा
मुंबई,2 मे : व्होडाफोन आयडियाने ग्राहकांसाठी व्हीआयसी ही या क्षेत्रातील पहिलीवहिली, अत्याधुनिक एआयवर आधारित डिजिटल ग्राहकसेवा व सपोर्ट व्हर्च्युअल असिस्टंट सेवा आज दाखल केली आहे. ही सेवा आता वेबसाइट, माय व्होडाफोन व माय आयडिया अॅप्स यावर, तसेच व्हॉट्सअॅप या सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅपवर उपलब्ध केली जाणार आहे.
स्टील्थ मोड स्टार्ट-अप ओरिसर्व्हच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने व्होडाफोन आयडियासाठी ही सेवा निर्माण करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे, ग्राहकांना घरबसल्या त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या समस्या, सेवेबद्दलच्या अपेक्षा पूर्ण करणे व्होडाफोन आयडियाला शक्य होणार आहे. व्हीआयसीमुळे व्होडाफोन व आयडिया ग्राहकांना बिले भरणे, रिचार्ज, व्हीएएस, प्लान सुरू करणे, नवीन कनेक्शन, डाटा बॅलन्स, बिल रिक्वेस्ट अशा अनेक सेवांसाठी तातडीने प्रतिसाद मिळणार आहे.
व्होडाफोन आयडियाचे चीफ टेक्नालॉजी ऑफिसर विशांत व्होरा यांनी सांगितले, “ग्राहकांना कनेक्टेड ठेवण्यासाठी आणि डिजिटल सुविधांचा वापर करून त्यांना उत्तम सेवा देण्यासाठी व्हीआयएल प्रयत्नशील आहे. डिजिटल फर्स्ट या आमच्या दृष्टिकोनाच्या अनुषंगाने, आम्ही तंत्रज्ञानाच्या मदतीने सातत्याने निरनिराळे पर्याय शोधत आहोत व अमलात आणत आहोत. हे पर्याय किफायतशीर, सोयीस्कर आहेत व आमच्या ग्राहकांना तातडीने उपाय देणारे आहेत. ओरिसर्व्ह या आमच्या टेक्नालॉजी पार्टनरने तयार केलेली व्हीआयसी ही एआय-आधारित उत्कृष्ट ग्राहकसेवा सुविधा या क्षेत्रातील पहिलीवहिली आहे आणि ग्राहक सध्या घरीच असल्याने या महत्त्वाच्या कालावधीमध्ये ही सेवा विशेष महत्त्वाची आहे.”
व्हीआयसी वापरण्यास सुलभ, सुरक्षित आहे व ग्राहकांना उद्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संधी आज उपलब्ध करून त्यांना व्होडाफोन आयडियाशी संवाद साधण्याची सेवा देते. सध्या सर्व लोकांना घरातच बसावे लागत असल्याने विविध ठिकाणच्या ग्राहकांना सध्या व्हर्च्युअल/डिजिटल हा आधार घ्यावा लागतो आहे. काळाची गरज विचारात घेता, व्होडाफोन आयडिया व्हीआयसी व्हर्च्युअल असिस्टंट 24×7 उपलब्ध असणार आहे, व्होडाफोन व आयडिया या दोन्ही ग्राहकांना एकसमान ग्राहकसेवा व सुरळीत सर्व्हिस अड्रेसल सेवा देणार आहे.
व्होडाफोन आयडिया युजरना व्हीआयसीचा वापर करून व्हॉट्सअॅपवर संभाषण सुरू करण्यासाठी एसएमएसद्वारे एक लिंक पाठवली जाईल. किंवा, ही सेवा वापरण्यासाठी ग्राहकांनी केवळ लिंकवर क्लिक कावे किंवा पुढे दिलेल्या क्रमांकांवर मेसेज पाठवावा.
व्होडाफोन केअर – 9654297000
Vodafone Care bitly – https://bit.ly/2xKGVNf |
आयडिया केअर – 7065297000
Idea Care bitly – https://bit.ly/2XPRjOf |
कोविड-19च्या झपाट्याने होणाऱ्या संक्रमणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी व्हीआयसीची निर्मिती करण्यात आले. या संक्रमणामुळे जगभर माणसांवर आधारित असणाऱ्या कस्टमर सपोर्ट पर्यायांमध्ये बदल करावे लागले आहेत. ग्राहकांच्या निरनिराळ्या सेवांविषयक गरजा व मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रभावी, तातडीने प्रतिसाद देणे शक्य होण्यासाठी, अत्याधुनिक, एआय, एनएलपी, सखोल अभ्यास व अन्य उपयुक्त तंत्रज्ञान यांच्या मदतीने व्हीआयएलसाठी व्हीआयसीची निर्मिती केली आहे