मुंबई : आयएमसी चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे आज मुख्यमंत्री सहायता निधीस 50 लाख रुपयांची मदत करण्यात आली. या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सह्याद्री अतिथीगृह येथे सुपूर्द करण्यात आला. यावेळी आयएमसी चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आशिष वेद, उपाध्यक्ष राजू पोदार, महासंचालक अजित मंगळूरकर, उपसंचालक संजय मेहता, आदी उपस्थित होते.