मुंबई : म्हाडाने इमारतीचा एकल पुनर्विकास करण्याबाबत फेरविचार करावा, याबाबत मनसे सहकार सेना आक्रमक झाली आहे. एकल (Single) इमारतीच्या पुनर्विकासासपरवानगी देण्यात येणार नाही, असे परिपत्रक म्हाडाने काढले आहे. याला महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे उपाध्यक्ष मनोहर जाधव यांनी विरोध केला आहे. एकल पुनर्विकास करण्याबाबत फेरविचार करा, अशी मागणी त्यांनी म्हाडाला पत्र लिहून केली आहे. मनसेचे विभागीय अध्यक्ष विश्वजित ढोलम यांनी जाधव यांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे.
कन्नमवार नगर ही म्हाडाची ६० वर्षाची जुनी वसाहत आहे. कन्नमवार नगरमध्ये आतापर्यंत ३०% जुन्या इमारतींचे नव्याने पुनर्विकासाला मंजुरी मिळाली आहे. उर्वरित इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. काही इमारतींचा विकासकासोबत विकास करारनामा झालेला आहे. तर काही इमारती विकासकाच्या सांगण्यावरून विस्थापित झाल्या आहेत. शासनाच्या दि. २८ एप्रिल २०२२ च्या परिपत्रकामुळे अनेक सोसायटीतील सभासद भयभित झाले आहेत, याकडे मनोहर जाधव यांनी लक्ष वेधले आहे.
विकासक मात्र सोसायट्यांना घरे खाली करण्याचे निर्देश देत असून (जबरदस्तीने गाळे रिकामे करणे) खोट्या माहितीच्या आधारे दिशाभूल करत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे सभासदांमध्ये भ्रमनिरास झाला आहे. कन्नमवार नगरमध्ये राहणारा सर्व सामान्य रहिवाशी या परिपत्रकामुळे भयभित होऊन, आपल्या इमारतीचे पुढे काय होणार? या विवेचनेमध्ये आहे, असे जाधव म्हणाले आहेत.
शासनाच्या परीपत्रकात एकल (Single) इमारतीच्या पुनर्विकासास परवानगी देण्यात येणार नाही. तरी म्हाडा प्राधिकरणाने इमारतीचा एकल (Single Bldg.) विकास करण्याबाबत फेर विचार करावा. तसेच ज्या इमारतींचा “विकास करारनामा” (Development Agreement) झाला आहे. तसेच ज्या इमारती विस्थापित झाल्या आहेत. यांच्याबाबत पुनर्विचार करून, त्यांना शासनाची त्वरित अधिकृत परवानगी (Intimation of
Disapproval or Authorization) मिळावी, अशी मागणी म्हाडा प्रशासनाकडे जाधव यांनी केली आहे.