मुंबई, (निसार अली) : मुंबई महापालिका आयोजित चित्रकला स्पर्धेत दक्षीण विभागात इमामवाडा उर्दू शाळेच्या इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थिनींनी प्रथम, द्वितीत आणि तृतीय स्थान पटकावून बाजी मारली. या विद्यार्थीनींचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. प्रथम क्रमांक सरदार सना, द्वितीय फातिमा हसन नकवी तर तृतीय स्थान सबीया पिरजादे हिने पटकावले.
दक्षिण विभागात हिंदी, मराठी, कन्नड आणि उर्दू माध्यमाचे २०० विद्यार्थी सहभागी झाले होते. पालिकेच्या ए,बी,सी आणि डी प्रभागातून माझी मुंबई या विषयावर चित्रकला स्पर्धा झाली. शिक्षक आणि मार्गदर्शक असलम शाह यांनी या तिन्ही विद्यार्थिनींचे कौतुक केले आहे. प्रशासकीय अधिकारी यांच्या कार्यालयात शिक्षण अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक देण्यात आले, असे शाह यांनी सांगितले.