मुंबई : भारतीय प्रौद्योगिकी संस्था (आयआयटी) मुंबईला केंद्र शासनाच्या मानव संसाधन विभागाच्या वतीने एक हजार कोटी रुपयांचे सहाय्य देण्यात आले आहेत. त्यातून उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण होणार असून संशोधन आणि नावीण्यपूर्णतेवर विद्यार्थ्यांनी विशेष भर द्यावा, असे आवाहन प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी केले. आयआयटी मुंबईच्या 56 व्या वार्षिक दीक्षांत समारंभात ते बोलत होते.कार्यक्रमास राज्यपाल चे. विद्यासागरराव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभीच प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी दीक्षांत समारंभात पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. गेल्या सहा दशकांत आयआयटीने केलेल्या निरंतर प्रयत्नांमुळे आज या संस्थेने देशातील नामांकित संस्थांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. आयआयटी आणि येथील पदवीधरांच्या उल्लेखनीय कार्याचा राष्ट्राला अभिमान आहे. आयआयटीच्या यशाने देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची निर्मिती झाली, ज्यांची आयआयटी ही प्रेरणा आहे, यामुळे भारत हे जगातील सर्वात मोठे तांत्रिक मनुष्यबळ असलेले केंद्र बनले असल्याचेही प्रधानमंत्री श्री. मोदी यावेळी म्हणाले.गेल्या चार वर्षांमध्ये आपल्या सर्वांसाठी शिकण्याचा एक अद्भूत अनुभव होता, महाविद्यालय उत्सव, वसतीगृहे, आंतर विद्याशाखा, संघटना आदी गोष्टींमधून त्याची प्रचिती आपल्याला येते. दर्जेदार, सर्वोत्कृष्ठ शिक्षण आपल्याला या शिक्षणप्रणालीद्वारे प्राप्त झाले आहे. येथे विद्यार्थी भारताच्या विविधतेचे प्रतिनिधीत्व करतात, विविध भाषा, अनेकविध प्रकारची पार्श्वभूमी असलेले विद्यार्थी ज्ञान आणि शिकण्यासाठी येथे एकत्र होत असल्याचेही प्रधानमंत्री म्हणाले. आयआयटीला देशात, जगात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून ओळखले जात असले तर आज त्याची व्याख्या बदलली आहे, हे फक्त तंत्रज्ञानापुरते मर्यादित राहिली नाही तर आयआयटी म्हणजे इंडियाज इन्स्ट्रुमेन्ट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन (भारताच्या परिवर्तनाचे साधन) झाले असल्याचेही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी
दीक्षांत समारंभात 2621 विद्यार्थ्यांना पदवीप्रदान तर 380 विद्यार्थी पीएचडीने सन्मानितआयआयटी मुंबईच्या झालेल्या 56 व्या वार्षिक दीक्षांत समारंभात 2621 विद्यार्थ्यांना विविध विषयांतील पदवी प्रदान करण्यात आली तर 380 विद्यार्थ्यांना पीएचडी पदवीने सन्मानित करण्यात आले. आयआयटी मुंबई आणि मोनाश विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविलेल्या पीएचडी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना मोनाश विद्यापीठाचे कुलगुरु तथा अध्यक्ष प्रा. मार्गारेट गार्डनर यांच्या हस्ते 29 विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.