
मुंबई, (निसार अली) : माझ्या विरोधात भाजपच्या एका प्रवक्त्याने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विरोधी पक्षातील नेते इतक्या खालच्या स्तराला जात आहेत. मी घाबरून, पळून जाईल. तसं होणार नाही. ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ‘, हा माझा हिंदू धर्म आहे. मी माझं आयुष्य सुख समाधान, आनंदात जगत होते, ते सोडून राजकारणात आले. मला खासदारकी फक्त नावाला नको, तर मी वेळेचा उपयोग लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी करेन. माझ्यावर लहानपासून पुरोगामी विचारांचे संस्कार झाले आहेत, असे प्रतिपादन उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघ काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी केले. कांदिवली चारकोप येथील एकविरा शाळेच्या सभागृहात रविवारी सकाळी 11 वाजता उर्मिला मातोंडकर यांना पाठिंबा देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी राष्ट्रसेवा दलाचे मुंबई अध्यक्ष शरद कदम, फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसीचे आशुतोष शिर्के, आमदार विद्या चव्हाण माकपचे शैलेंद्र कांबळे, राष्ट्रवादीचे विनायक पाटील, पत्रकार युवराज मोहिते आणि बँक कर्मचारी नेते विश्वास उटगी आणि वैशाली निसार आली यांनी आपले विचार मांडले.
मराठी माणूस आणि मध्यम वर्गातील माणूस उदास अवस्थेत जगत आहे. तो मागे फेकला गेला आहे. मागासलेले खडतर जीवन जगत आहेत. यासाठी आपण लढले पाहिजे, असे उर्मिला म्हणाल्या.
लोकशाही अखंड अबाधित ठेवण्यासाठी मोदी सरकार पडलेच पाहिजे. आपण प्रत्येकाने मेहनत घेऊन उर्मिला मातोंडकर यांना विजयी करायचं आहे. असा विश्वास उपस्थितांमध्ये निर्माण करण्यात आला.
















