रत्नागिरी (आरकेजी): राजापूरमधल्या नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबत काँग्रेसचे शिष्टमंडळ आजपासून नाणार परीसराच्या दौऱ्यावर आले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने काँग्रेस पार्टी असणार आहे. नाणार आॅईल रिफायनरीला आमचा देखील विरोध असेल. तसेच हा प्रकल्प रद्द करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचे एक शिष्ठमंडळ लवकरच राहूल गांधीच्या भेटीला जातील. ही भेट लवकरच आम्ही घडवून आणू अशी माहिती खासदार हुसेन दलवाई यांनी दौऱ्यादरम्यान दिली. तसेच या दौऱ्यासंदर्भातील रिपोर्ट काॅग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांना दिला जाईल, असे दलवाई म्हणाले.
आशिय़ा खंडातील सर्वात मोठ्या प्रस्तावीत आॅईल रिफायनरीवरून सध्या रणकंदान माजलं आहे. विविध राजकीय पक्षांनी आपले नाणार दौरे जाहिर केलेत. त्याच पद्धतीने आता काॅग्रेसचे शिष्ठमंडळ हि नाणार दौऱ्यावर येणार आलंय. काॅग्रेस प्रवक्ते आणि खासदार हुसेन दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली आज आणि उद्या असे दिवस हे शिष्ठमंडळ प्रकल्पग्रस्तांची भेट घेणार आहेत. राजापूरच्या विश्रामगृहापासून या दौऱ्याला सुरवात झाली. माजी खासादार भालचंद्र मुणगेकर, आमदार मोहम्मद नसीम खान, आमदार पी.डी सावंत, आमदार हुस्नबानो खलिपे, माजी आमदार रवी पाटील, रमेश कदम, माणिक जगताप, विश्वनाथ पाटील असा २० जणांचा फौज फाटा या शिष्ठमंडळात आहे. पहिल्यांदा दत्तवाडी त्यानंतर पडवे, साखर आणि सागवे अशा गावांना या शिष्ठमंडळाने भेटी दिल्या. दोन दिवस नाणारमधल्या प्रकल्पग्रस्तांची हे शिष्ठमंडळ भेट घेईल आणि त्यानंतर या यासंदर्भातील अहवाल काॅग्रेसच्या प्रदेशअध्य़क्षांना सादर केला जाईल. उद्या नाणार, इंगळवाडी, तारळ आणि चौके अशा गावांना भेटी देईल. तसेच मच्छिमार बांधवांसोबत सुद्धा चर्चा करणार आहे, अशी माहिती खासदार हुसेन दलवाई यांनी दिली.