मुंबई, विशेष प्रतिनिधी:- काँग्रेसला अच्छे दिन आले असून गेल्या काही दिवसांपासून पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. आज ठाणे, नाशिक व बीड जिल्ह्यातील भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसने १३५ वर्षात खूप चढ उतार पाहिले आहेत पण काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या पाहता काँग्रेस पुन्हा एकदा दिमाखाने उभारी घेईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
गांधी भवन येथे बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहापूरचे माजी आमदार महादू बरोरा यांचे चिरंजीव दत्तात्रय महादू बरोरा. नाशिक जिल्हा भाजप कोअर कमिटी सदस्य कैलास वसंतराव आव्हाड, नाशिक जिल्हा भाजपा ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष अमीन पठाण, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शरीफ गफार शेख, युवा मोर्चाचे अध्यक्ष तौफीक जाकीर पठाण. बीड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रवि ढोबळे. मराठा आरक्षण समितीचे संयोजक बीडचे नामदेव लगड, सामाजिक कार्यकर्ते प्रा. विजय पवार, प्रविण लगड, अस्लम शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी तसेच कल्याण डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते शामराव यादव यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
थोरात यांच्यासोबत प्रदेश सरचिटणीस मा. आ. मोहन जोशी, यशवंत हाप्पे, राजाराम देशमुख, दादासाहेब मुंडे, विनायक वाजपेयी, शरद आहेर आदी उपस्थित होते.
थोरात यांच्याहस्ते सांस्कृतिक सेलच्या विद्या कदम, पर्यावरण सेलचे समीर वर्तक व वाणिज्य सेलचे रमेश पवार यांचा पदवितरण सोहळा पार पडला. तसेच काँग्रेसच्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही थोरात यांच्या हस्ते झाले.