
पुणे: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ८८.४१ टक्के इतका लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याच्या संख्येमध्ये एक टक्क्यांनी घट झाली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शकुंतला काळे यांनी ही माहिती दिली.विभागनिहाय टक्केवारीचा विचार केल्यास दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणातील विद्यार्थ्यांनी बाजी मारलीय. कोकणचा निकाल ९४.८५ टक्के इतका लागलाय. तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी लागलाय. नाशिकचा निकाल ८६.१३ टक्के इतका लागला आहे.पुणे विभाग तिसऱ्या स्थानावर आहे. पदवीच्या दृष्टीनं महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेत मुलींनी मुलांना मागे टाकलंय. उत्तीर्ण झालेल्या मुलींची टक्केवारी ९२.६३ इतकी असून ८५.२३ टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत. तर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.७८ टक्के इतकी आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये १२ जून रोजी सकाळी ११ वाजता गुणपत्रिकांचं वाटप करण्यात येईल.दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी मारली बाजी मारल्याचे चित्र आहे. राज्यात यंदा १४ लाख १६ हजार ९८६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी १२ ख ५२ हजार ८१७ र्थी उत्तीर्ण झाले आहेत.















