
कलेला कोणतीही भाषा नसते .. कला सादर करणारा कलाकार ह्याची लोकप्रियता कुठे आणि कशी असेल याबाबत कोणीही सांगू शकत नाही. सध्या तर सोशल मीडिया मुळे अक्ख विश्व जवळ आलय. आज आपण घरी बसून संपूर्ण जगात काय सुरू आहे हे पाहू शकतो. सध्या झी युवा वाहिनीवरील आपल्या सर्वांची लाडकी फुलपाखरू म्हणजे हृता दुर्गुळे पंजाब ला तिचा हॉलिडे एन्जॉय करतेय. आणि तिला आश्चर्याचा सुखद धक्का बसला कारण तिथेसुद्धा तिला लोकांनी तिला एक कलाकार म्हणून ओळखले
तर झालं असं ती सोशल मीडिया वर तिच्या ट्रॅव्हल च्या अपडेट टाकत होती. मुंबई एअरपोर्ट , अमृतसर एअरपोर्ट , हॉटेल असं पण त्यानंतर तिने गोल्डन टेम्पल ला जायचा प्लॅन केला . पण तो अपडेट नाही केला . गोल्डन टेम्पल ला आल्यावर तिला दोन पंजाबी मुलांनी अडवले आणि म्हणाले हृता मॅम एक सेल्फी चाहीये .. हृता ला काही कळेनाच , आपण आपल्या महाराष्ट्रापासून एवढे लांब वेगळ्या प्रांतात , वेगळ्या भाषेतील प्रदेशात आणि ते मला ओळखतात ..तिने त्यांना विचारले असता ते म्हणाले , माडमजी हम आपके फॅन है , आपको सोशल मीडिया पे आपको फोल्लो करते है , आपका अपडेट हम देख रहे थे , पर आप गोल्डन टेम्पल कब आओगे ये पता नही था , इसलीये सुबह से हम क्लास बंक करके यहा आपका इंतजार कर रहे थे , मॅम प्लिज एक सेल्फी मिल शकती है ?? त्यांनंतर शॉपिंग ला एक दुकानात गेली तिथे सुद्धा आप एक्टर हो ना .. सोशल मीडियाचा फैलाव आणि हृता ची लोकप्रियता खरंच किती प्रचंड आहे हे सध्या कोणीच सांगू शकत नाही















