मुंबई : करिअरच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या हौसिंग सोसायटी व्यवस्थापन कोर्सला मुलुंडमध्ये सुरुवात झाली आहे. ओजस्वी इन्स्टिटय़ूटने आयोजन केले आहे. दर रविवारी दुपारी २ : ३० ते संध्याकाळी ५ : ३० या वेळेत मुलुंड पश्चिम जे.एन रोडवरील मुलुंड विद्यामंदिर येथे हा कोर्स सुरू असणार आहे. मार्गदर्शक तज्ञ संतोष(भाई) पालव असणार आहेत. कोर्स माहितीबाबत प्रशांत : 9022747507 आणि उज्वला आर. टी. 86576 61084 यांच्याकडे संपर्क साधावा. शुल्क माफक असे आहे. कोर्सची रूपरेखा पुढीलप्रमाणे
रविवार २६ मार्च, २ एप्रिल, ९ एप्रिल रोजी शिकविले जाणारे विषय : सोसायटी उपविधी (1 ते 174)
अ. सोसायटीचे कामकाज करताना सोसायटी उपविधीनुसार कामकाज चालणं
ब. उपविधींचे अर्थ, सखोल विश्लेषण आदी विषय यात सामाविष्ट असतील.
क. ट्रान्स्फर आणि ट्रान्समिशन, अर्ज प्रक्रिया
रविवार १६ एप्रिलचे विषय पुढीलप्रमाणे
नवीन सुधारणा कलम 154 ब संपूर्णपणे
कलम 154 ब हा हौसिंग क्षेत्रासाठी असून महत्वाची सुधारणा आहे. 154 ब नुसार कामकाज कसे करावे. त्याचे महत्व, त्यातील उपकलम आदी विषय सामाविष्ट असतील.
रविवार २३ एप्रिल चे विषय पुढीप्रमाणे
रेकॉर्ड बनविणे व हौसिंग सोसायटीतील इतर शंकांचे समाधान सोसायटी रेकॉर्ड तसेच मिनिट्स कसे बनवावेत, लिहावेत याबाबत सखोलपणे सांगितले जाईल.
रविवार ३० एप्रिल : विशेष उजळणी आणि प्रमाणपत्र वितरण होईल.
करियर कसे ते वाचा
सदर कोर्स सहा दिवस असेल(आठवड्यातून एकदा ) प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असेल. गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन या प्रमाणपत्र कोर्समध्ये गृहनिर्माण संस्थांशी संबंधित असणाऱ्या समस्या कशा सोडवाव्यात याबाबत संपूर्णपणे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सदर कोर्स करियरच्या दृष्टीने यशाच्या पायऱ्या चढणारा आहे. हा कोर्स संपूर्णपणे मराठी भाषेत शिकविण्यात येईल. या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी त्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करतील. हा कोर्स व्यवसायिक असून त्याचदृष्टीने अभ्यासक्रमाची मांडणी करण्यात आली आहे.
आपण ज्या गृहनिर्माण संस्थेत राहतो. त्याबाबतचे कामकाज नियमानुसार कसे झाले पाहिजे, हे सांगितले जाणार आहे. आता गगनचुंबी इमारती बांधल्या जात आहेत. म्हणजेच गृहनिर्माण संस्थाच्या इमारती यांना एक छोटेसे पंरतु आधुनिक खेडे आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे या संस्थांचे दैनंदिन कामकाज होणे दिवसेंदिवस कठिण होत चालले आहे. अनेक ठिकाणी वेतनावर व्यवस्थापकाची नियुक्ती करावी लागत आहे. अनेकदा हे व्यवस्थापक प्रशिक्षित नसल्याने संस्थेचा कारभार हाकताना तांत्रिक, कायदेशीर अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणी सोडविण्यासाठीदेखील ओजस्वी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग चा हौसिंग सोसायटी व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.