मुंबई: विद्या विकास एज्युकेशन सोसायटी, विक्रोळी, आणि स्वामी शामानंद एज्युकेशन सोसायटी, घाटकोपर यांच्या संयुक्त विद्यमाने हुनर २०२५ या कलादर्पण कला महोत्सवाचे आयोजन २० आणि २१ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले आहे. या महोत्सवात नेल आर्ट, ज्वेलरी आर्ट, होम डेकोर, केन वर्क, ग्लास कॅनवास, टाइल्स आणि फॅब्रिक पेंटिंग, मिनिएचर आर्ट, लाईव्ह स्केचिंग व पेंटिंग, लाईव्ह मेहंदी आर्ट, लाईव्ह टॅटू आर्ट, पेपर क्राफ्ट, टीन आर्ट, खाद्यपदार्थ व पेय, आयटी रोबोटिक्स, टेक्नोआर्ट, तसेच दिव्यांग विशेष विद्यार्थ्यांच्या कलाकृती यांसारख्या विविध कलात्मक उपक्रमांचा समावेश आहे. या महोत्सवाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी संस्थेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. अनघा राऊत यांच्याकडे आहे. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मारुती म्हात्रे (संचालक, अमरकोर विद्यालय, भांडुप), श्री. संजीव पलांडे (अप्पर आयुक्त, कोकण विभाग) उपस्थित राहणार आहेत. तसेच श्री. औदुंबर सराफ, नगरसेविका राजराजेश्वरी रेडकर, श्री. आदेश नवकुडकर, डॉ. सचिन राणे, श्री. महेंद्र उबाळे, श्रीम. ममता राव, श्री. सदानंद रावराणे (अध्यक्ष, मिलिंद विद्यालय), आणि श्री. अशोक बेलसरे (अध्यक्ष, शिक्षक भारती संघटना) यांचीही विशेष उपस्थिती आहे.
याशिवाय विकास कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात जल्लोष या महाविद्यालय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन २२ आणि २३ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. या महोत्सवात विद्यार्थ्यांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येईल.प्रिंट अँड पाल्म प्रिंट फेस पेंटिंग, टी-शर्ट पेंटिंग, पोस्टर पेंटिंग, सलाड सजावट, कोलाज, मेहंदी, रांगोळी, नेल आर्ट, रील मेकिंग, कविता वाचन, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, बेस्ट आउट ऑफ वेस्ट, निबंध लेखन स्पर्धा, गायन, नृत्य, समूह नृत्य, रॅप सादरीकरण, आणि व्यक्तिमत्त्व विकासावर आधारित “विकासश्री व विकासकुमारी” अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या व्यापारी कौशल्य आणि उद्योजकता विकासासाठी “उद्योजकता कौशल्य विकास उपक्रम” देखील राबविण्यात येणार आहे. यामध्ये अन्नपदार्थ, स्टेशनरी, तयार कपडे, दागिने यांसारख्या स्टॉल्सद्वारे विद्यार्थ्यांना स्टार्टअप कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे.
कार्यक्रम स्थळ: विद्या विकास एज्युकेशन सोसायटी सभागृह, कन्नमवार नगर-२, विक्रोळी (पूर्व), मुंबई