नवी दिल्ली : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लिमिटेड (एमएमएसआय)ने अॅक्टिव्हा 4 जी ही स्कूटर आजपासून बाजारात आणली.
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लिमिटेडचे विक्री आणि वितरण विभागाचे उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले की, “अॅक्टिव्हा 4जी ही सर्वाधिक लाडकी स्कूटर ठरणार आहे. ही नवी गाडी ग्राहकांना मोबाइल चार्ज करण्यासाठी सॉकेट सुविधाही देणार आहे, तसेच ती दोन नव्या रंगांत उपलब्ध आहे.” अॅक्टिव्हा 4जी ५०,७३० रुपयांपासून (एक्स शोरूम, दिल्ली) उपलब्ध आहेत.
अॅक्टिव्हा 4जी ची वैशिष्ट्ये
– मोबाइल चार्ज करण्यासाठी सॉकेट
– इक्विलायझरसह कॉम्बी ब्रेक सिस्टम
– इक्विलायझरमुळे पुढून आलेला दाब रोखण्यास मदत
– सुलभ ब्रेक यंत्रणेमुळे गाडी चालवण्याच्या आत्मविश्वासात वाढ
रंग
मॅट सेलेन -सिल्व्हर मेटॅलिक, मॅट अॅक्सिस- ग्रे मेटॅलिक.
ट्रान्स ब्लू मेटॅलिक, इम्पेरिअल रेड मेटॅलिक, ब्लॅक, पर्ल अमेंझिंग व्हाइट आणि मॅजेस्टीक ब्राउन मेटॅलिक