मुंबई 4 मे 2023- होमफर्स्ट फायनान्सचा कर्जवाटपात तब्बल 33 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे.ही वाढ वर्षानुवर्षे आधारे विशेषतः गृहकर्जात झाली. मागील 48 करोड निव्वळ नफ्याच्या तुलनेत यंदा 64 करोड इतका झाला आहे.
सध्याचा नफा राखण्याच्या कठीण परिस्थितीत हा निव्वळ नफा मिळवण्यात कंपनीला यश झाले आहे.या तिमाहीत कर्ज वितरण 641 कोटी रूपयांहून 869 कोटी रुपये इथपर्यंत पोहोचले आहे. कर्ज वितरणात कंपनीचा उत्पन्न व्याजदर मागील वर्षी ५.५% हून कमी होऊन ५.६ % इतका घोषित करण्यात आला आहे. तिसऱ्या तिमाहीत हा आकडा सुमारे ५.७ % इतका होता.