
मालाड,ता.28 (निसार अली) : पोयसर होली क्रॉस रोडवर पारंपरिक पद्धतीने होळी साजरी होत आहे. 80 पेक्षा जास्त वर्षांपासून पोयसर गावात अती भव्य होलिकोत्सव साजरा करण्यात येतो. गावातील समस्त धर्मातील नागरिक होळीत आनंदाने सहभागी होतात. सगळ्यांचा हातभार लागून होलिका मातेचे अतिशय मोहक असे स्वरूप साजरे केले जाते.
जुन्या पारंपरिक पद्धतीने मातेची ओटी भरली जाते. मानाची तळी मातेला अर्पण केली जाते. दहनाच्या आधी होळी मातेच्या भोवती 5 फेरे घातले जातात आणि मगच होळी चे दहन केले जाते.