रत्नागिरी, (आरके) : होळीचा माड पुलाववरून घेऊन जात असताना तो कोसळल्याने १२ जण जखमी झाल्याची घटना काल घडली. त्यात १० मुलांचा समावेश आहे. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी इथे हा प्रकार घडला. कोसळलेला पूल ३५ वर्ष जुना होता. गावातील होळीचा माड उभा करण्यासाठी ग्रामस्थ निघाले होते. हा साकव दुरुस्त करण्याची मागणी अनेकवेळा करुनही दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप ग्रामथांनी केला.