घाटकोपर : हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सुरक्षतेच्या दृष्टीने नेहमी व्यस्त असणाऱ्या पोलिसांना मैत्रीचा धागा बांधून मैत्री दिवस साजरा करत आहे . आज मैत्री दिनानिमित्त घाटकोपर मधील व्यापारी वर्गातील हिंदू मुस्लिम बांधवांनी घाटकोपर चिरागनगर पोलीस ठाण्यात पोलिसांच्या हातात मैत्रीचा ब्रॅण्ड बांधून शुभेच्छा देत मैत्री दिवस साजरा केला. व्यापारी मंडळाचे उद्योजक परेश पाटडिया , रिक्षाचालक साजिद शेख, प्रदीप उपाध्याय, राजेश शहा, राजेश सत्रा यांनी आज मैत्री दिन साजरा करत पोलिसाना शुभेच्छा दिल्या.
समाजाच्या सुरक्षतेसाठी पोलीस नेहमी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत असतात. देश आणि समाजाची सुरक्षा करत असताना ते सण, उत्सव आणि आपलं कुटुंब विसरतात अशा पोलिसांशी मैत्रीसंबंध दृढ व्हावे, या हेतूने आम्ही व्यापारी मित्रांनी पोलिसांसोबत मैत्री दिवस साजरा केल्याचं परेश पाटडिया यांनी सांगितले.
घाटकोपर सहायक पोलीस आयुक्त दीप बने, पोलीस निरीक्षक विलास दातीर, किरण खरात, धनंजय मेमाणे आदी पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते .