मुंबई : हर्षी इंडिया प्रा. लि. या हर्षी कंपनी या जगातील एका आघाडीच्या स्नॅकिंग कंपनीचा भाग असलेल्या कंपनीने सोफिट प्रोटिन कूकीज दाखल करून, बिस्किट श्रेणीतील महत्त्वाच्या‘बेटर फॉर यू’ सेग्मेंटमध्ये प्रवेश करण्याचे नियोजन केले आहे.
लज्जतदार सोफिट प्रोटिन कूकीज हे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन असून त्यामध्ये प्रोटिन, ओमेगा-3, फायबर व व्हिटॅमिन समाविष्ट आहेत. त्यामध्ये ट्रान्स-फॅट व मैदा यांचा समावेश नाही. ह्या क्रंची कूकी गहू, ओट्स, सोया अशा धान्यांनी आणि फ्लॅक्स सीड्स, बदाम, कोको, बेदाणे व आंबा अशा घटकांनी बनवले आहे. चवदार प्रोटिन कूकीज सादर करून, सोफिटने आजच्या आरोग्याविषयी जागरुक ग्राहकांसाठी ‘बेटर फॉर यू’ स्नॅकिंग पर्याय द्यायचे ठरवले आहे.
हर्षी कंपनीच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायामध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे आणि कंपनी लक्ष केंद्रित करत असलेल्या बाजारांपैकी भारत एक आहे. हर्षी इंडिया देशातील विविध स्नॅकिंग ऑकेजन्समध्ये प्रवेश करण्यासाठी व स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठीहर्षीज व सोफिट या महत्त्वाच्या ब्रँडवर भर देत आहे.सोया मिल्क श्रेणीमध्ये सोफिट निर्विवादपणे आघाडीवर आहे. सर्व श्रेणींमध्ये `बेटर फॉर यू’ स्नॅकिंग पोर्टफोलिओ घडवून, सोफिटच्या भविष्यातील वाढीला चालना देणे, हे हर्षी इंडियाचे उद्दिष्ट आहे.
हर्षी इंडिया नव्या श्रेणीत प्रवेश करत असल्याबद्दल, हर्षी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक हरजीत भल्ला म्हणाले, “या 2.8 अब्ज डॉलरच्या बिस्किट श्रेणीमध्ये, प्रोटिन असलेल्या कूकीसारखे विशेष व ग्राहकांसाठी उपयुक्त उत्पादन दाखल करणे, हे सोफिट ब्रँडच्या दृष्टीने अचूक पाऊल आहे. प्रोटिन व न्यूट्रिएंट पुरवणारा ब्रँड म्हणून सोफिट ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. सोफिट प्रोटिन कूकीज आपल्यासाठी चांगले असलेल्या क्रंचिलीश स्नॅक ह्याला सोपी व सोयीस्कर बनवतात.”
प्रोटिन कूकिजसाददर करणे ‘एनर्जी टू डू मोअर’ या सोफिटच्या आश्वासनानुसार असून, त्यामार्फत लज्जतदार रेंजच्या माध्यमातून डाएटरी न्यूट्रिएंट्स पुरवली जाणार आहेत. ही‘बेटर फॉर यू’ कूकीज हेल्दी फ्लॅक्स सीड्ससह नॅचरल कोको; खरे बदाम; लज्जतदार मँगो; हेल्दी फ्लॅक्स सीड्स सह रिफ्रेशिंग मनुके अशा पर्यायांत उपलब्ध आहेत.
देशातील मोठ्या मेट्रो शहरांतल्या काम करणाऱ्या व्यक्तींसाठी विशेषतः तयार करण्यात आलेल्या सोफिट प्रोटिन कूकीजचा फायदा निरोगी व सक्रिय जीवनशैली जगण्यासाठी उत्सुक असणाऱ्या व्यक्तींना होणार आहे. सोफिट प्रोटिन कूकीज देशातील मोठ्या शहरांतील मॉडर्न ट्रेड, मोठे पारंपरिक ट्रेड स्टोअर्स व ई-कॉमर्स येथे उपलब्ध असतील. हे उत्पादन 45 रुपयांत लहान (100 ग्रॅम) व 65 रुपयांत टेक होम पॅक (150 ग्रॅम) अशा आकर्षक किमतीला मिळेल.