मुंबई मधील बांद्रा– कुर्ला कोविड केंद्राला व वनिता समाज कोविड केंद्राला वैद्यकिय सेवा सुविधांना ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि इतर वैद्यकिय साधनांचा पुरवठा
मुंबई, 03 जून 2021: भारतामध्ये कोविड-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव बघता, वर्ल्ड व्हिजन इंडिया नामक मानवतेवर आधारीत काम करत असलेल्या संस्थेद्वारे, रसातळातील अत्यावश्यक सुविधा जसे लाईफ़ सेविंग मेडिकल किट, हायजिन किट आणि मानसिक तसेच सामाजिक आधार पुरविण्याचे कार्य केले जाते आहे.
माधव बेलामकोंडा, सीईओ आणि राष्ट्रीय संचालक, वर्ल्ड व्हिजन इंडिया म्हणाले, “कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेने जवळ जवळ संपूर्ण देशालाच विळखा घातलेला आहे, ज्याचा परिणाम म्हणून समाजातील सदस्यांच्या आरोग्याला गंभीर स्वरूपाचे धोके निर्माण होत आहेत, विशेषत: लहान मुलांमध्ये. ग्रामीण भागांमध्ये कोविड-19 चा संसर्ग हा मोठ्या प्रमाणात फ़ैलावताना दिसत असून त्यामुळे होणारी मृत्युची संख्या देखील मोठी आहे. वर्ल्ड व्हिजन इंडिया सातत्याने शासनासह ग्रामीण भागांमधील आरोग्य सेवा प्रणाली मजबूत बनविण्याकरिता कार्य करत आहे. अतीशय जलद अशा गतीने ग्रामीण भागातील रूग्णालयांची क्षमता वाढविणे आवश्यक आहे ज्यामुळे लोकांना तिथल्या तिथे उपचार मिळू शकेल आणि त्यांचा मोलाचा जीव वाचविता येऊ शकेल.”
कोविडच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव बघता, वर्ल्ड व्हिजन इंडिया द्वारे 5 लिटर क्षमतेचे 35 ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर्स मुंबई येथील दोन शासकिय केंद्रांना देण्यात येत आहेत. पहिल्या 15 ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर्सची देणगी ही जी/नॉर्थ वार्ड वनिता समाज यांना केली गेली आहे, जे एक 280 खाटांचे कोविड रूग्णालय असून, ती डॉ. श्रृतिका – नोडल अधिकारी, मुंबई महानगरपालिका कोविड रूग्णालय यांच्या सुपूर्त करण्यात आली. त्याच प्रमाणे दुसऱ्या 20 ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर्सची देणगी ही एमएमआरडीए च्या 200 खाटा असलेल्या बांद्रा- कुर्ला कोविड सुविधा केंद्राला देण्यात आली आहे.
या अत्यावश्यक लाईफ़ सेविंग साधनांची उपलब्धी करून दिल्याबद्दल बोलताना, वनिता समाज कोविड सेंटरचे , डॉ. युसूफ़ खान म्हणाले, “ हे 280 खाटांचे कोविड रूग्णालय, बीएमसीच्या जी नॉर्थ वार्ड तर्फ़े चालविले जाते. कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये, ऑक्सीजन सॅच्युरेशन आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांचे रूग्ण झपाट्याने वाढताना दिसून येत आहेत. प्रत्येकच कोविड केंद्रावरती ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर्सची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर जाणवते आहे. बीएमसी जी-नॉर्थ वार्डच्या वतीने आम्ही या कठीणप्रसंगामध्ये आम्हाला योग्य त्यावेळेला ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेशन मशीन्स उपलब्ध करून दिल्याबद्दल वर्ल्ड व्हिजन इंडियाचे ऋणी आहोत आणि त्यांचे मनापासून आभार मानतो.”
ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर्स दान करण्या व्यतिरिक्त, निर्भिड आणि अथक परिश्रम घेणाऱ्या आपल्या आरोग्य सेवकांच्या संरक्षणाकरिता, वर्ल्ड व्हिजन इंडियाद्वारे संरक्षण सामग्री जसे एन95 मास्क, सॅनिटायझर आणि हॅन्ड ग्लोवज देखील दिले जात आहेत. संरक्षण साधने ही बीकेसी कोविड सुविधा, राजावाडी शासकिय रूग्णालय, घाटकोपर आणि शासकिय आरोग्य पोस्ट, धारावी येथे प्रदान करण्यात येते आहे. या केंद्रांवरती ही संरक्षण साधन, डॉ.विद्या ठाकूर- कोविड सुविधा प्रमुख आणि डॉ. टिना लाड- प्रमुख, आरोग्य पोस्ट धारावी यांच्या हाती सोपविण्यात आली.
मुंबईव्यतिरिक्त, वर्ल्ड व्हिजन इंडियाचा विचार, हा इतर निवडक रूग्णालयांसह आरोग्य सेवा केंद्रांना मदत करण्याचा आहे, ज्यामुळे विशेषत: इतर ठिकाणच्या (भारतातील स्थानिक 118 ठिकाणे) 1000 खाटा आणि पलंगांची सुविधा असलेल्या आरोग्य सुविधांना 1300 ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर्स पुरवली जाणार आहेत ज्यामुळे त्यांना त्यांच्या आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करता येऊ शकेल. याशिवाय इतर वैद्यकिय नसलेली पण आवश्यक साधने जसे, थर्मामीठर, पीपीई किट देखील दिली जात आहेत.
वर्ल्ड व्हिजन इंडियाद्वारे समाजामध्ये लसीकरणाप्रती देखील जागृकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, ज्याकरता समाजामध्ये विश्वास असलेल्या चांगल्या नेतृत्वांच्या मदतीने आम्ही विविध राज्यांमध्ये कोविड प्रतिबंध आणि कोविड-19 च्याकरिता लसीकरणाचे महत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत.
कोविड-19 च्या पहिल्या लाटेच्या वेळेला, मार्च -2020 मध्ये वर्ल्ड विजन इंडिया सुमारे 4.8 दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचले होते आणि त्यांच्यामध्ये मास्क, ग्लोवज, पीपीई किट ही वैद्यकिय सेवार्थींना प्रदान करण्यात आली होती, तसे लहान मुलांसह इतरांमध्ये जीवानावश्यक वस्तू जसे स्वच्छता पुरवठा, खाद्यपदार्थांची पाकिट, कोरडे राशन, शैक्षणिक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला होता.