लातूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले. उड्डाण घेताच हेलिकॉप्टर कोसळले. आज दुपारी बाराच्या सुमारास निलंगा येथे हा अपघात घडला.
मी आणि माझी टीम सुरक्षीत आहे. काळजी करण्याचे कारण नाही, असे ट्विट मुख्यमंत्र्यांनी अपघातानंतर केले आहे. भाजपाच्या शिवार संवाद या कार्यक्रमासाठी फडणवीस हे लातूर दौर्यावर आले होते.
मी सुरक्षीत आहे. हा एक छोटासा अपघात होता. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, महाराष्ट्रातील ११ कोटी जनतेचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
दरम्यान, अपघातात हेलिकॉप्टरचे नुकसान झाले आहे.